कोपरगाव तालुका
कोपरगावातील ..या बँकेच्या पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
उत्तर महाराष्ट्रासह उत्तर नगर जिल्ह्यातील सहकारात अग्रणी असलेल्या कोपरगाव शहरातील कोपरगाव पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड नुकतीच सहकार विभागाचे सहाय्यक निबंधक एन.जी.ठोंबळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बैठकीत झाली असून बँकेच्या अध्यक्षपदी कोपरगाव नगरपरिषदेचे नगरसेवक सत्येन मुंदडा यांची बिनविरोध निवड झाली आहे.नूतन पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
नूतन अध्यक्ष सत्येन मुंदडा हे कोपरगाव नगरपरिषदेचे नगरसेवक तर जिल्हा लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष आहे शिवाय बँकेचे गत बारा वर्षांपासून संचालक आहे.अ,नगर जिल्हा नागरी बँक असोसिएशन्सचे विद्यमान संचालक आहे.त्यांनी कोपरगाव लायन्स क्लबचे अध्यक्ष असताना विविध सामाजिक उपक्रम राबवले होते त्यांच्या कार्याची दखल वरिष्ठ नेत्यांनी घेतली आहे.
नूतन अध्यक्ष हे कोपरगाव नगरपरिषदेचे नगरसेवक तर जिल्हा लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष आहे शिवाय बँकेचे गत बारा वर्षांपासून संचालक आहे.अ,नगर जिल्हा नागरी बँक असोसिएशन्सचे विद्यमान संचालक आहे.त्यांनी कोपरगाव लायन्स क्लबचे अध्यक्ष असताना विविध सामाजिक उपक्रम राबवले होते.त्यांना नगरपरिषदेत कोल्हे गटाने स्वीकृत नगरसेवक पदी निवड केली असून त्याला ते चांगले जागल्याचे दिसून आले आहे.त्यांच्या नावाची सूचना बँकेचे संचालक राजेंद्र शिंगी यांनी त्यांच्या नावाची सूचना मांडली त्याला रवींद्र ठोळे यांनी अनुमोदन दिले आहे.
विद्यमान अध्यक्ष अतुल काले,उद्योजक कैलास ठोळे,रतनशेठ ठोळे,डॉ.विजय कोठारी,रवींद्र लोहाडे,सुनील कंगले,कल्पेश शहा,सुनील बंब,हेमंत बोरावके,वसंत आव्हाड,संजय भोकरे,महाव्यवस्थापक दीपक एकबोटे,व्यवस्थापक जितेंद्र छाजेड यांनी त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.