जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जलसिंचन

गोदावरी कालव्यांच्या शेवटच्या शेतकऱ्यास पाणी मिळेपर्यंत प्रयत्नशील-आश्वासन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

गोदावरी कालव्यांचे आयुर्मान शंभर वर्षापेक्षा जास्त झाल्यामुळे कालव्यांची वहन क्षमता कमी झाली त्याचा परिणाम सिंचनावर होत असल्यामुळे गोदावरी कालव्यांची दुरुस्ती हा मुख्य अजेंडा डोळ्यासमोर ठेवून केलेल्या प्रयत्नातून चाळीस कोटी रुपये निधी मिळविण्यात यश मिळाले असले तरी पुढील निधी मिळवून शेवटच्या लाभधारक शेतकऱ्यांना एकाचवेळी पूर्ण क्षमतेने आवर्तन मिळावे यासाठी प्रयत्नशील असून पुढील कामासाठी लवकरात लवकर निधी मिळावा यासाठी पाठपुरावा सुरूच राहणार असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी आज एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

“गोदावरी जुन्या कालव्याच्या नुतनीकरणासाठी लाभधारक शेतकऱ्यांची अनेक दिवसांची निधीची मागणी होती.त्या साठी केलेल्या पाठपुराव्याला जलसंपदामंत्री ना.जयंत पाटील यांनी प्रतिसाद देऊन प्रत्येक वर्षी १०० कोटी या प्रमाणे कालव्यांच्या दुरुस्तीसाठी चार वर्षात ४०० कोटी रुपये निधी देण्याचे कबूल केले आहे त्यापैकी पहिल्या टप्प्यातील ४० कोटी मिळाले असून अजून ४२ कोटी लवकरच मिळणार आहे”आ.आशुतोष काळे.

गोदावरी कालव्याच्या नूतनीकरणासाठी आमदार आशुतोष काळे यांनी ४० कोटी रुपये निधी मंजूर करून आणल्याबद्दल कोपरगाव तालुक्यातील लाभधारक शेतकऱ्यांनी व पाणी वापर संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी आ.काळे यांचा सत्कार केला याप्रसंगी ते बोलत होते.

सदर प्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर,राजेंद्र खिलारी, सुभाष दवंगे, सतीशशेठ कृष्णाणी,उमाकांत बारहाते,जगन्नाथ बागल, नामदेव जाधव, सय्यदबाबा शेख,नवनाथ जाधव,सर्जेराव कदम, रघुनाथ सिनगर,रामदास खडकाळे,अजिनाथ खडकाळे,शिवाजी शेळके,भवर गुरुजी,रितेश वल्टे,कैलास सिनगर,सागर खटकाळे,सावळेराम खटकाळे,माधवराव खटकाळे,दत्तू कर्डक,गणेश भवर,दिगंबर धुमाळ,संदीप लांडगे,आबासाहेब खटकाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”गोदावरी कालव्यांनी शंभरी ओलांडली आहे.वाढत्या लोकसंख्येचा विचार करता कालव्यांची वहन क्षमता वाढणे हि काळाची गरज आहे.जलसंपदा विभागाने माजी आ.काळे यांच्या कार्यकाळात कालव्यांची दुरुस्ती केली होती.मात्र मागील पाच वर्षात दुर्दैवाने कालवा दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाले.गोदावरी कालव्याच्या लाभधारक शेतकऱ्यांची अनेक दिवसांची मागणी होती.त्या दृष्टीने केलेल्या पाठपुराव्याला जलसंपदामंत्री ना. जयंत पाटील यांनी प्रत्येक वर्षी १०० कोटी याप्रमाणे कालव्यांच्या दुरुस्तीसाठी चार वर्षात ४०० कोटी रुपये निधी देण्याचे कबूल केले आहे त्यापैकी पहिल्या टप्प्यातील ४० कोटी मिळाले असून अजून ४२ कोटी लवकरच मिळणार आहे.उजवा कालवा १२० व डावा कालवा ९० किलोमीटर पर्यंत कालव्यांची लांबी असून दुरुस्ती करण्यासाठी मोठा कालावधी जाणार आहे.कालव्यांचे नूतनीकरण झाल्यांनतर वहन क्षमता वाढणार आहे.यापूर्वी वहन क्षमता कमी असल्यामुळे आवर्तन पूर्ण होण्यास लागणारा कालावधी कमी होण्यास मदत होवून पाण्याची तुट कमी होवून पाटबंधारे यंत्रणेवरचा ताण देखील कमी होईल असेही आ.काळे यांनी शेवटी सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close