कोपरगाव तालुका
मराठा समाजाला आरक्षण द्या,कोपरगाव राष्ट्रवादीची मागणी
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा २२ व्या वर्धापन दिनाचे औचीत्य साधत आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी कोपरगाव शहर युवक कॉंग्रेसच्या वतीने देशाचे पंतप्रधान नरेद्र मोदी यांना पत्र पाठविण्याची मोहीम हाती घेण्यात आली असून “एक पत्र मराठा युवकांच्या उज्वल भविष्यासाठी” या मोहिमेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन कोपरगाव शहर युवक कॉंग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे.
दरम्यान दुसऱ्या एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आज २२ वा वर्धापन दिन कोपरगाव येथे पार पडला कार्यक्रमास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे,जिल्हा सरचिटणीस सचिन मुजगुले,जिल्हा संघटक देवेन रोहमारे,कर्मवीर शंकररावजी काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,शहराध्यक्ष सुनील गांगुले,आणि मच्छीन्द्र खिलारी आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.
मराठा समाजाने लोकशाही मार्गाने आरक्षण मिळावे यासाठी शांततेच्या मार्गाने ५८ मोर्चे काढले.त्या माध्यमातून मराठा समाजाला न्याय मिळेल अशी अपेक्षा होती.मात्र आरक्षणाचा मुद्दा न्यायप्रविष्ट होऊन सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला आरक्षण नाकारले आहे.मराठा समाजाला आरक्षण मिळणे गरजेचे असून त्यासाठी कायद्यात बदल करणे अनिवार्य आहे.त्यासाठी केंद्र शासनाची भूमिका अत्यंत महत्वाची आहे.यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने लक्ष घालुन मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी मागणी या पत्रात करण्यात आली असून अशा आशयाचे पत्र राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज पाठविण्यात आले.
याप्रसंगी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष नवाज कुरेशी,संदीप कपिले,कार्तिक सरदार,सागर लकारे,शुभम शिंदे,संतोष दळवी,संदीप सावतडकर, ऋषिकेश खैरनार,महेश उदावंत,संदीप देवळालीकर,आकाश डागा,ऋतुराज काळे,भूषण निमसे,समीर बर्डे,स्वप्नील सोनवणे,शुभम भुजबळ आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आज २२ वा वर्धापन दिन कोपरगाव येथे पार पडला कार्यक्रमास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे,जिल्हा सरचिटणीस सचिन मुजगुले,जिल्हा संघटक देवेन रोहमारे,कर्मवीर शंकररावजी काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,शहराध्यक्ष सुनील गांगुले,आणि मच्छीन्द्र खिलारी आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.