जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
नगर जिल्हा

संदीप वर्पे यांना लाभले शरद पवारांच्या पाहूणचारांचे भाग्य !

जाहिरात-9423439946

संपादक -नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी )

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे राजकारणातील पितामह भीष्म मानले जातात त्यांच्या विधानसभेच्या कोपरगाव प्रचार दौऱ्यात सभा संपल्यावर त्यांचा पाहुणचार करण्याचे भाग्य जिल्हा राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संदीप वर्पे यांना लाभले असून त्यांनी त्यांच्या घरी जवळपास अर्धा ते पाऊण तास आपला वेळ व्यतीत केल्याची माहिती हाती आली आहे.

सदर प्रसंगी कर्मवीर काळे सहकारी कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे,पुष्पाताई काळे,जिल्हा राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस सचिन मुजगुले,शहराध्यक्ष सुनील गंगूले आदींसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी म्हणाले होते भारताला जागतिक स्तरावर अन्न-धान्यात निर्यातदार देश बनविण्यात शरद पवारांचे मोलाचे योगदान आहे. शरद पवार यांचे देशासाठी अनन्यसाधारण योगदान आहे. केंद्रीय कृषीमंत्री म्हणून सलग 10 वर्ष काम करताना त्यांनी देशाच्या शेती विकासासाठी रचनात्मक कार्य केले. एके काळी भारताला तांदूळ आयात करावा लागत असे, देशाची या गंभीर समस्येतून मुक्तता करण्यासाठी पवारांनी वैज्ञानिक व तज्ज्ञांची मदत घेतली. याकरिता शेतकर्‍यांचे प्रबोधन केले. याचा परिपाक म्हणून जगात प्रथम क्रमांकाचा तांदूळ निर्यातदार देश म्हणून भारताची नवी ओळख निर्माण करून दिली. जागतिकस्तरावर गहू निर्यातीतही देशाला अव्वल स्थानावर पोहचविले. त्या कामांची यादी फार लंबीचौडी आहे विस्तार भयास्तव ती येथे देणे शक्य नाही.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही बारामतीत जाऊन त्यांचे जाहीर कौतुक केल्याचे अनेकांच्या स्मरणात असेल.अशा नेत्याचा सहवास मिळणे व आपल्या घरी येऊन सामान्य कार्यकर्त्याला पाहूनचाराची संधी मिळणे राजकारणाच्या सध्याच्या घाऊक बाजारपेठेत हि तशी फारच देवदुर्लभ बाब.मात्र ते भाग्य लाभले ते मूळचे राहुरी तालुक्यातील गुहा येथील रहिवाशी व वर्तमानात कोपरगावला आपली कर्मभूमी मानणारे जिल्हा राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संदीप वर्पे याना.

शरद पवारांनी वर्पे यांना प्रदेश पातळीवर तत्कालीन मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून सचिव पदाची जबाबदारी दिली होती.व त्याचे बॅनर लावल्यावर त्याची शाई सुकते ना सुकते तोच येथील तत्कालीन ईशान्य गडावरील स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांना मोठा पोटदुखीचा आजार झाला होता.व तो सदरचे फलक काढल्यावरच बरा झाला होता.याला फार दिवस झाले नाही.अशा परिस्थितीत साखर पट्ट्यातील सामान्य कार्यकर्त्यांस काम करणे व स्वतःचे अस्तित्व या अशा बड्या पक्षात निर्माण करणे हि बाब किती कर्म कठीण आहे हे समजून यावे.

राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून त्यासाठी सर्वच पक्षांच्या राष्ट्रीय नेत्यांची देशभर प्रचाराच्या सभांसाठी धावपळ सुरु आहे.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे हि त्यास अपवाद नाही त्यांचा नुकताच कोपरगाव तालुक्यात दौरा संपन्न झाला.तहसील मैदानावर भरगच्च सभेला त्यांनी संबोधित केल्यावर त्यांना रात्री आठ वाजेच्या दरम्यान वयपरत्वे विश्रांतीची गरज होती.तसेच अल्पोहाराचीही.मात्र या संधी शक्यतो सामान्य कार्यकर्त्यांच्या वाट्याला तर दुर्मिळच.मात्र शरद पवार हे अत्यंत चाणाक्ष राजकारणी मानले जातात व कोणत्यावेळी कोणती खेळी करायची हे त्याना सांगण्याची गरज नाही.मागील काही दिवसापासून नगर जिल्ह्यात राजकीय अवकाशात मोठी राजकीय उलथापालथ झाली असून.”माय लेकराला धरत नाही”अशी स्थिती आहे. त्याला कोपरगाव तालुकाही अपवाद नाही.कोपरगावात ज्यांना पोटभर दिले ज्यांची आयुष्यभर वतने पवारांनी वाढवली त्यांनीच गत विधानसभा निवडणुकीत त्याना अंगठा दाखवला.अनेक संकटाच्या घडीत ज्यांनी हुकुमाचा एक्का असलेल्या पवारांना आपल्या मतदारसंघात बोलावुंन आपले संकट हरण केले त्या पवारांना प्रतिकूल काळात अंगठा दाखवून त्यांना कोलदांडा घातला.

शरद पवार,अजित पवार यांच्या काळातही वर्पे हे पुरातही पुरून उरणाऱ्या लोहाळ्यासारखे ठरले.याची दखल शरद पवारांनी गत नगर जिल्ह्याच्या गत महिन्यातील दोन दौऱ्यातही ठेवली होती व संपूर्ण दौऱ्यात त्यांनी संदीप वर्पे याना सोबत घेतल्याचे जिल्ह्यातील अनेक दिग्जांनी अनुभवले आहे.त्याला वेगळ्या शब्द प्रपंचाची गरज नाही.शरद पवारांचा त्यांनी यथोचित सत्कार केलाच पण वर्पे यांचे माजी प्राचार्य वडील गोरक्षनाथ (जी.जी.) वर्पे सर,मातोश्री प्रा.प्रमिला वर्पे भाऊ डॉ. नचीकेत वर्पे,अभियंता समीर वर्पे,आदींची आस्थेवाईकपणे चौकशी करून संदीप वर्पे यांचे गूण गायले आहेत. त्यामुळे हे कुटुंब भारावून गेले आहे.

याच पवारांनी वर्पे यांना प्रदेश पातळीवर तत्कालीन मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून सचिव पदाची जबाबदारी दिली होती.व त्याचे बॅनर लावल्यावर त्याची शाई सुकते ना सुकते तोच येथील तत्कालीन ईशान्य गडावरील स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांना मोठा पोटदुखीचा आजार झाला होता.व तो सदरचे फलक काढल्यावरच बरा झाला होता.याला फार दिवस झाले नाही.अशा परिस्थितीत साखर पट्ट्यातील सामान्य कार्यकर्त्यांस काम करणे व स्वतःचे अस्तित्व या अशा बड्या पक्षात निर्माण करणे हि बाब किती कर्म कठीण आहे हे समजून यावे.तरीही संदीप वर्पे यांनी हाय सोडली नाही व चिवटपणे त्या पक्षाशी बांधिलकी जपून ठेवली मधल्या काळात पुन्हा एकदा पक्षास प्रतिकूल काळ येवून गेल्याचे वाचकांना आमच्या प्रतिनिधीने दिलेल्या बातम्या वाचून आठवत असेल. या काळातही वर्पे हे पुरातही पुरून उरणाऱ्या लोहाळ्यासारखे ठरले.याची दखल शरद पवारांनी गत नगर जिल्ह्याच्या दौऱ्यातही ठेवली होती व संपूर्ण दौऱ्यात त्यांनी संदीप वर्पे याना सोबत घेतल्याचे जिल्ह्यातील अनेक दिग्जांनी अनुभवले आहे.त्याला वेगळ्या शब्द प्रपंचाची गरज नाही.शरद पवारांचा त्यांनी यथोचित सत्कार केलाच पण वर्पे यांचे माजी प्राचार्य वडील गोरक्षनाथ (जी.जी.) वर्पे सर,मातोश्री प्रा.प्रमिला वर्पे भाऊ डॉ. नचीकेत वर्पे,अभियंता समीर वर्पे,आदींची आस्थेवाईकपणे चौकशी करून संदीप वर्पे यांचे गूण गायले आहेत. त्यामुळे हे कुटुंब भारावून गेले आहे.व त्यांचा शरद पवार हे आपल्या घरी येऊन गेल्याचा त्यांचा विश्वासच बसत नाही.मात्र हे खरे आहे व हे घडून आले ते संदीप वर्पे यांच्या कर्तृत्वामुळे.खचितच याचा अभिमान त्यांच्या आई वडिलांना वाटला असेल तर त्यात किंचितही अतिशयोक्ती मानता येणार नाही इतकेच या निमित्ताने म्हणता येईल.सध्या संदीप वर्पे हे माजी आ. अशोक काळे,व युवा नेते आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close