कोपरगाव तालुका
सांगवी भुसार येथील “त्या”रस्त्याच्या कार्यवाही करण्याचे जिल्हाधिकऱ्यांचे आदेश
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव ( प्रतिनिधी )
कोपरगाव तालुक्यातील सांगवी भुसार ग्रामपंचायत हद्दीत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून दोन फेब्रुवारी रोजी प्रजिमा-4 ते सांगवी भुसार (ग्रामीण मार्ग -64) या सव्वातीन कि.मी.मार्गासाठी मंजूर करण्यात आलेला 2 कोटी 54 लाख 66 हजारांचा निधी हा काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपल्या हद्दीतील रस्त्याकडे वळविण्याचा डाव आखला होता त्याला गावातील शेतकऱ्यांनी कसून विरोध करुन त्या बाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती त्याची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली असून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता यांना कार्यवाहीचे आदेश दिल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
या बाबत चौकशी अधिकारी नेमुन चौकशी केली होती त्या अहवालात सदरचा रस्ता तक्रारदार शेतकरी म्हणत असल्याचाच निष्पन्न झाले होते.त्यामुळे शेतकरी संतापले होते त्यांनी याबाबत असून त्यांनी या बाबत जिल्हाधिकारी अहमदनगर यांचेकडे लेखी तक्रार केली होती.व असंबंध रस्त्याचे काम सुरु करण्याच्या दिवशी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता त्याची दखल नुकतीच जिल्हाधिकारी यांनी घेतली असून त्यांनी तक्रारदार शेतकऱ्यांना उलट टपाली पत्र पाठवून या प्रकरणी तात्काळ योग्य ती कारवाई करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता यांना य याकामी चौकशी करून या तक्रारदार शेतकऱ्यांना आत्मदहनापासून परावृत्त करण्याचे निर्देश दिले आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की, सांगवी भुसार या ग्रामपंचायत हद्दीत प्रमुख जिल्हा मार्ग ते सांगवी भुसार हा रस्ता स्थानिक शेतकऱ्यांना व नजीकच्या गावांना वाहतुकीसाठी अहंम मानला जातो.त्यासाठी त्यांनी सरकारकडे पाठपुरावा करून दोन कोटी 54 लाख 66 हजार रुपयांचा निधी राज्य शासनाच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मोठ्या प्रयत्नाने 2 फेब्रुवारी 2019 रोजी मंजूर केला होता.या रस्त्या बरोबरच जिल्ह्यात सोळा व त्यात कोपरगाव तालुक्यातील या रस्त्या सोबतच अन्य तीन रस्ते मंजूर करण्यात आले असून या रस्त्याला सर्वात जास्त निधी मंजूर झाला आहे.हा रस्ता विकास आराखड्यात मंजूर हि आहे.तथापि हि बाब स्थानिक कोपरगाव तालुक्यातील काँग्रेस व राष्ट्रवादी नेत्यांच्या लक्षात आल्यावर यांच्या मनात या रस्त्या बाबत असूया निर्माण झाली व त्यांनी या रस्त्याचा निधी आपल्या स्वार्थासाठी नजीकच असलेल्या ग्रामीण मार्ग दहासाठी पळविण्याचा डाव आखला त्यासाठी नगर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना हाताशी धरले व त्यानां या शेतकऱ्यांना हा रस्ता तुमचा नाहीच अशी बतावणी केली होती.मात्र शेतकऱ्यांनी त्यांना जुमानले नाही.व त्याबाबत अधिकची माहिती अधिकारात उपलब्ध करून या नेत्यांचे बिंग फोडले होते. अखेर या बाबत शेतकऱ्यांनी कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे यांचेकडे या बाबत तक्रार केली. त्यानी या बाबत चौकशी अधिकारी नेमुन चौकशी केली होती त्या अहवालात सदरचा रस्ता तक्रारदार शेतकरी म्हणत असल्याचाच निष्पन्न झाले होते.त्यामुळे शेतकरी संतापले होते त्यांनी याबाबत असून त्यांनी या बाबत जिल्हाधिकारी अहमदनगर यांचेकडे लेखी तक्रार केली होती.व असंबंध रस्त्याचे काम सुरु करण्याच्या दिवशी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता त्याची दखल नुकतीच जिल्हाधिकारी यांनी घेतली असून त्यांनी तक्रारदार शेतकऱ्यांना उलट टपाली पत्र पाठवून या प्रकरणी तात्काळ योग्य ती कारवाई करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता यांना य याकामी चौकशी करून या तक्रारदार शेतकऱ्यांना आत्मदहनापासून परावृत्त करण्याचे निर्देश दिले आहे.
सदर पत्राची प्रत रावसाहेब जाधव यांना पाठवली आहे.जिल्हाधिकारी यांनी दखल घेतल्या बाबत आंदोलक शेतकरी माणिक शिंदे, जीवन जाधव, देवराम वाबळे,मोहन कासार,काशिराम हांडे,शिवाजी जाधव,बाबासाहेब जाधव,सतीश शिंदे आदींनीं समाधान व्यक्त केले आहे.