कोपरगाव तालुका
कृष्णा काळे यांनी लष्करात मोठ्या पदावर निवड
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर सारख्या ग्रामीण भागातील कृष्णा सतीश काळे यांनी आपल्या जिद्दीच्या जोरावर भारतीय नौसेनेमध्ये सबलेफ्टनंट या पदावर सरळ नियुक्ती मिळविली आहे. सबलेफ्टनंट या अधिकारीपदी सरळ नियुक्ती झालेले हे तालुक्यातील पहिले अधिकारी ठरले आहे. त्यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे.
त्यांची नुकतीच इझिमाला,केरळ येथे त्यांची पासिंग आऊट परेड संपन्न झाली होती.ते कै.भास्करराव माधवराव काळे यांचे नातू व के. जे.सोमैया महाविद्यालयातील,रसायनशास्त्र विभाग प्रमुख,प्रा.डॉ.सतीश काळे यांचे चिरंजीव आहे.कृष्णा काळे यांनी आपले दहावीपर्यंतचे शिक्षण महर्षी विद्या मंदिर कोकमठाण येथून पूर्ण केले व दहावीला असताना त्याने औरंगाबाद येथील सैनिक सेवापूर्व प्रशिक्षण संस्थेची (एस.पी.आय.) परीक्षा दिली व त्यात ते उत्तीर्ण झाल्याने बारावी पर्यंतचे त्यांचे शिक्षण तेथेच झाले. ही परीक्षा देतानाच त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगा (UPSC) मार्फत घेतली जाणारी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एन. डी. ए.) ची परीक्षा दिली व उत्तीर्ण झाले,त्यानंतर स्टाफ सिलेक्शन बोर्ड (एस. एस. बी) मार्फत त्यांची रितसर निवड झाली. ते २०१७ मध्ये अखिल भारतीय गुणवत्ता यादीत आल्याने यशस्वी झाले व त्यांना राष्ट्रीय नौदल संरक्षण प्रबोधनी इजिमाला,केरळ येथे प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले.सदर प्रशिक्षण पूर्ण करीत असतानाच त्यांनी पुढील चार वर्षात बी.टेक. ही अभियांत्रिकी शाखेची पदवी प्राप्त केली..
भारतीय नौदलात कोपरगांव व संवत्सर सारख्या खेड्यातील अधिकारी पद प्राप्त करणारी त्यांची वाटचाल पुढील शैक्षणिक पिढ्यांना निश्चितच प्रेरणादायी आहे.आपण ठरविले व जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी ठेवली तर आपणही असेच उच्चपदस्थ पदे प्राप्त करून देशसेवा करून,आपल्या कुटुंबालाही अभिमान वाटेल असे काही करू शकतो हे या निमित्ताने त्यांने सिद्ध झाले आहे.
चि.कृष्णा यांनी नेत्रदीपक यश प्राप्त केल्याबद्दल संवत्सरच्या गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,उपसरपंच विवेक परजणे,कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे,सचिव.ऍड.संजीव कुलकर्णी व प्राचार्य डॉ.बी.एस.यादव व के.जे.सोमैया व के.बी.रोहमारे महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आदींनी अभिनंदन केले आहे.