जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावातील शाळेचे पत्रे उडाले,जीवितहानी टळली

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहर व तालुक्यात आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास आलेल्या वादळाने कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील कोपरगाव बेट येथील शाळा क्रं.पाचचे मोठं नुसान झाले असून या शाळेच्या उत्तरेकडील खोलीचे पत्रेच संगाड्यासह उडून गेले आहे.मात्र सुदैवाने जीवित हानी झाली नाही.

जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार आज दुपारी साडेतीनच्या सुमारास वायव्येकडून वादळाने मोठे काहुर उठवले होते.त्यातून अनेकांच्या घराचे किरकोळ नुकसान झाले असले तरी कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील कोपरगाव बेट येथील शाळा क्रमांक पाचच्या उत्तर बाजूकडील वर्गखोलीचे पत्रे सांगाड्यासह उडून गेले आहे.

आज दुपारी वेधशाळेने वर्तवल्यानुसार व जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार आज दुपारी साडेतीनच्या सुमारास वायव्येकडून वादळाने मोठे काहुर उठवले होते.त्यातून अनेकांच्या घराचे किरकोळ नुकसान झाले असले तरी कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील कोपरगाव बेट येथील शाळा क्रमांक पाचच्या उत्तर बाजूकडील वर्गखोलीचे पत्रे सांगाड्यासह उडून गेले आहे.व दक्षिणेकडील खोलीवर जाऊन पडले होते.सुदैवाने कोरोना साथीमुळे शाळा बंद होत्या त्या मुळे मोठा अनर्थ टळला आहे.येथील शिक्षकांनी याबाबत नगरपरिषद शिक्षण विभागाला या बाबतची माहिती कळवली असता प्रशासनाधिकारी मोहनिश तुंबारे यांनी घटनास्थळाला भेट देऊन नुकसानीची पाहणी केली आहे.दुर्घटनेनंतर शिक्षकांनी शाळेतील साहित्य सुरक्षितस्थळी हलवले आहे.या ठिकाणी वर्ग १ ते ७ पर्यंत वर्ग भरत असतात.या शाळेची स्थापना होऊन १०४ वर्षाचा मोठा कालखंड उलटून गेला आहे.हि इमारत मारुती देवस्थान ट्रस्ट यांची असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.या ठिकाणी नवीन शाळा इमारत बांधून द्यावी अशी मागणी पालकांनी केली आहे.

दरम्यान याबाबतची माहिती सुशांत घोडके यांना मिळाल्यावर त्यांनी आगामी वादळाचा धोका गृहीत धरून तातडीने काही सहकाऱ्यांच्या मदतीने घटनास्थळी जाऊन अर्धवट निघालेले पत्रे काढुन घेऊन पुढील धोका टळण्यासाठी मदत केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close