जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आरोग्य

म्युकरमेकॉसिसचा मुकाबला करण्यासाठी कोपरगावात समिती गठीत

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

कोरोना बाधित रुग्ण कोरोनामुक्त झाल्यानंतर काही रुग्णांमध्ये म्युकरमायकोसीस आजाराचे लक्षण आढळून येत आहे.तसेच कोरोनाच्या येणाऱ्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा लहान मुलांना बाधा होण्याची शक्यता आहे त्या पार्श्वभूमीवर आ.आशुतोष काळे यांनी आरोग्य विभाग व प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन म्युकरमायकोसीस व संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी तालुका टास्कफोर्स समिती तयार केली आहे.

कोपरगाव तालुक्यात देखील या म्युकरमायकोसीसचे रुग्ण आढळण्याची शक्यता नाकारता येणार नाही. कोरोना संसर्गाचा सर्वाधिक धोका हा मधुमेह,उच्च-रक्तदाब, हृदयरोग असलेल्या लोकांना अधिक झाला आहे.कोविडची बाधा झालेल्यांपैकी बहुतांशी रुग्ण इतर व्याधींनी ग्रस्त आहेत.त्यापैकी अनेक रुग्ण कोरोनामुक्त झाले असले तरी देखील अशा रुग्णांना म्युकरमायकोसिस होण्याची शक्यता नाकारता येणार नाही त्या साठी या उपाययोजना करण्यात आल्या आहेत”-आ.आशुतोष काळे.

म्युकर मायकॉसिस’चा समावेश साथीच्या रोगांमध्ये करण्याच्या सूचना केंद्र सरकारने सर्व राज्यांना दिल्या आहेत.तसंच त्यासाठी काही मार्गदर्शक सूचना केंद्राने राज्यांना जारी केल्या आहेत.कोव्हिड बरा झालेल्या काही रुग्णांमध्ये डोळे आणि नाकाच्या इन्फेक्शनच्या तक्रारीमध्ये वाढ झाली आहे.या आजाराला ‘म्युकर मायकॉसिस’ म्हणतात.कोव्हिड बरा झालेल्या रुग्णांमध्ये काळ्या बुरशीचा संसर्ग झाल्याच्या तक्रारीमध्ये वाढ झाल्यानंतर अशा रुग्णांना राज्य सरकारकडून मोफत उपचार दिले जातील अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नुकतीच दिली आहे.कोव्हिड बरा झालेल्या काही रुग्णांमध्ये डोळे आणि नाकाच्या इन्फेक्शनच्या तक्रारीमध्ये वाढ झाली आहे.प्रसंगी काही जणांना आपला डोळा देखील गमवावा लागला आहे.एका बुरशीमुळे होणाऱ्या संसर्गामुळे अनेकांच्या मनात चिंता निर्माण झाली आहे.या पार्श्वभूमीवर हि बैठक कोपरगाव तहसील कार्यालयात आयोजित केली होती त्या वेळी हि माहिती त्यांनी दिली आहे.

सदर प्रसंगी तहसीलदार योगेश चंद्रे,मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसुंदर,डॉ.वैशाली बडदे,संदीप रोहमारे, डॉ.अजय गर्जे,डॉ.अतिष काळे,डॉ.दीपक पगारे,डॉ.शंतनू सरवार,डॉ. कुणाल घायतडकर,डॉ.अमोल अजमेरे,डॉ.अंजली फडके,डॉ.कुणाल कोठारी,डॉ.हेमंत राठी, डॉ. अस्मिता लाडे,डॉ.मयूर जोर्वेकर,डॉ.संतोष तिरमखे,डॉ.वरद गर्जे,डॉ.प्रियंका मुळे आदी मान्यवर उपस्थित होते.

या बैठकीत आरोय्य विभाग व प्रशासनाला मार्गदर्शन करतांना आ.काळे म्हणाले कि,कोरोनामुक्त झालेल्या काही रुग्णांना म्युकरमायकोसीस या बुरशीजन्य आजाराची लागण होत असल्याचे दिसून येत आहे.यासाठी आरोग्य विभागाने नागरिकांना विशेषतः कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांना सावधगिरीच्या सूचना देऊन जनजागृती करावी व योग्य ती काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन करावे. म्युकरमायकोसीसच्या रुग्णांना वेळेत उपचार उपलब्ध होवून रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांची धावपळ होणार नाही यासाठी योग्य नियोजन करून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात.तसेच कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या तिसऱ्या लाटेमुळे लहान मुलांना देखील जास्त प्रमाणात कोरोनाची बाधा होण्याचा धोका असल्याचे आरोग्य विभागाकडून सूचित करण्यात आले आहेत. त्याबाबत देखील आरोग्य विभाग व प्रशासनाने गाफील न राहता त्यासाठी आतापासूनच तयारीला लागावे.अशा सूचना त्यांनी आरोग्य विभागाला व प्रशासनाला दिल्या आहेत..

यावेळी म्युकरमायकोसीस या आजारासाठी कोपरगाव तालुका टास्कफोर्स समितीची स्थापना करण्यात आली असून यामध्ये अध्यक्ष म्हणून डॉ.कुणाल कोठारी,सदस्य-डॉ.अस्मिता लाडे,डॉ.अंजली फडके,डॉ.वैशाली बडदे,डॉ.कृष्णा फुलसौंदर यांची नेमणूक करण्यात आली आहे.तसेच संभाव्य तिसऱ्या लाटेपासून लहान मुलांचे संरक्षण करण्यासाठी देखील कोपरगाव तालुका टास्कफोर्स समितीची स्थापना करण्यात आली असून यामध्ये अध्यक्ष म्हणून डॉ.अजय गर्जे व सदस्य- डॉ.मयूर जोर्वेकर,डॉ.शंतनू सरवार,डॉ.वैशाली बडदे,सचिव म्हणून डॉ.अतिष काळे यांची नेमणूक करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close