जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात कोविड केंद्रास ऑक्सिजन काँस्रेटरची मदत

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या आवाहनाला तातडीने प्रतिसाद देत कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव येथे एस.एस.जी.एम. महाविद्यालयाच्या वसतिगृहात सुरु केलेल्या कर्मवीर शंकरराव काळे कोविड सेंटरला व महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्ट येथील कोविड केअर सेंटरला ११ लाखाची १३ ऑक्सिजन काँसट्रेटर मशीन भेट देण्यात आली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

कोरोना बाधित रुग्णांना मोठ्याप्रमाणात ऑक्सिजनची आवश्यकता भासत आहे. अजूनही ऑक्सिजनची टंचाई असल्यामुळे मात्र आवश्यकतेनुसार ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा होत नाही.तो तुटवडा दूर करण्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून या १३ ऑक्सिजन काँसट्रेटर मशीनची मोठी मदत होणार आहे. या १३ ऑक्सिजन काँसट्रेटर मशीनमुळे बाधित रुग्ण पूर्णपणे सुरक्षित राहणार आहे-तहसीलदार योगेश चंद्रे

कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांनी नुकतीच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट घेतली होती त्यावेळी त्यांनी कोविड केंद्रांना मदत करण्याचे आवाहन केले होते.त्याला प्रतिसाद देण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले आहे.
यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, कोपरगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, कोपरगाव शहराचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, तालुका आरोग्य अधिकारी संतोष विधाते, ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ.कृष्णा फुलसुंदर, विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमशेठ बागरेचा, माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील, नगरसेवक अजीज शेख,डॉ.चंद्रशेखर आव्हाड, रमेश गवळी,कृष्णा आढाव, नारायण लांडगे, विशाल निकम, डॉ. दीपक पगारे, डॉ. कुणाल घायतडकर,डॉ.भाग्यश्री घायतडकर,डॉ. राजेंद्र रोकडे, डॉ. अभिजित आचार्य,डॉ. रवींद्र शेळके,शेखर झगडे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना आ.काळे म्हणाले कि,मागील वर्षापासून संपूर्ण विश्वावर आलेल्या कोरोना संकटाचे मळभ अजूनही दूर होतांना दिसत नाही. या कोरोना विषाणूने अनेक कुटुंबांचे आधार हिरावून घेतले. दुर्दैवाने राज्याची देखील मोठी हानी झाली आहे. सर्व प्रकारच्या संकटात राज्यातील सहकारी साखर कारखानदारीने वेळोवेळी मोलाची मदत केली आहे. न भूतो न भविष्यती आलेल्या अशा जीवघेण्या संकट समयी सहकारी साखर कारखान्यांनी मदत करावी असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले होते.राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा कार्यकर्ता या नात्याने त्या आवाहनाला प्रतिसाद देणे हे आपले कर्तव्य आहे. ते कर्तव्य बजावून कोपरगाव येथे सुरु करण्यात आलेल्या १०० ऑक्सिजन बेडची सुविधा असलेल्या कर्मवीर शंकरराव काळे कोविड केअर सेंटरला कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या सहकार्याने मदतीचा हात देऊन १३ ऑक्सिजन काँसट्रेटर मशीन दिले आहेत. अजूनही पाच काँसट्रेटर मशीन देणार असल्याचे सांगत कोपरगाव ग्रामीण रुग्णालय येथे ऑक्सिजन प्लँटचे काम प्रगतीपथावर असून पवार यांनी केलेल्या सूचनेनुसार कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याने देखील ऑक्सिजन प्लँट उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे भविष्यात ऑक्सिजनचे संकट कायमस्वरूपी टळणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान १३ ऑक्सिजन काँसट्रेटर मशीनमुळे ऑक्सिजनची अडचण दूर होवून आरोग्य विभागाची चिंता कमी होण्यास मोठी मदत होणार आहे. यापूर्वीही आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयास व्हेंटीलेटर, बायपॅप, काँसट्रेटर मशीन साहित्य दिले आहे. कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण झाल्यास ती अडचण आमदार आशुतोष काळे तातडीने सोडवीत असल्यामुळे आरोग्य विभागाचे काम सोपे होत असल्याचे कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कृष्णा फुलसौंदर यांनी सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close