जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात आशुतोष काळेंचे राष्ट्रवादीकडून मोठ्या गर्दीत नामनिर्देशन दाखल

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी )

राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी काल नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी डॉ.आंबेडकर मैदानावरून आपल्या समर्थकांसह मोठी मिरवणूक काढून कर्मवीर काळे कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे यांनी अखेर राष्ट्रवादी पक्षाकडून आपले नामनिर्देशन दुपारी दीड वाजेच्या सुमारास माजी आ. अशोक काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत दाखल केल्याने वरिष्ठ नेत्यांचा जीव भांड्यात पडला असल्याचे चित्र आहे.

दरम्यान राष्ट्रवादी नेत्याचे निष्ठावान म्हणून गणले गेलेले जिल्हा राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संदीप वर्पे,उपाध्यक्ष दीपक साळुंके,सचिव सचिन मुजगुले आदींनी या मोर्चाकडे पाठ फिरवणेच पसंत केल्याचे दिसून आले आहे.ज्या वेळी आशुतोष काळे हे आपल्या लवाजम्यासमवेत निवडणूक कार्यालयाकडे येत होते त्यावेळी दीपक साळुंके हे आपला नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी धावपळ करताना तहसील परिसरात दिसत होते.तरीही त्यांनी काळेंच्या या मेळाव्याकडे पाठ फिरवणे पसंत केल्याने पक्ष व त्यांचे वरिष्ठ नेते अद्याप सावध भूमिकेत असल्याचे दिसत आहे.

कोपरगाव विधानसभा निवडणुकीत कोण कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार या बाबत शेवटपर्यंत गुपित राहिल्याने अनेक राजकीय निरीक्षकांचा श्वास कोंडल्यागत स्थिती झाली होती.कोपरगाव तालुका राजकीय दृष्ट्या जागरूक तालुका म्हणून ओळखला जातो.मात्र वर्तमान काळात देश आणि राज्यात भाजपचा ताप चढल्याने अनेकांच्या अंगात अंगात तो दिसून येत होता.त्याला काळेही अपवाद नव्हते.कोणत्याही पक्षात असले तरी आपल्याला उमेदवारी हि भाजपकडूनच मिळाली पाहिजे असा अनेकांनी हट्ट धरून त्यासाठी अक्षरशः देव पाण्यात बुडवून वरिष्ठ पातळीवर आपले प्रयत्न सुरु ठेवले होते,हि बाब झाकून राहिली नव्हती.त्यांनी आपल्या उमेदवारीला शेवटपर्यंत लढा दिला व त्याला चांगल्यापैकी यशही मिळाले होते.

दरम्यान आपले नामनिर्देशन पत्र दाखल केल्यानंतर आशुतोष काळे यांनी पत्रकारांशी संपर्क साधला त्यावेळी त्यांनी,विद्यमान आ. कोल्हे यांच्यावर तालुक्याचा विकास रोखल्याचा आरोप करून तालुक्यात वाळूचे ठेके कोणी घेतले ? शेतकऱ्यांचा संप कोणी मोडीत काढला ? शेती पाण्याची व शहर पाण्याची वाट कोणी लावली,तालुक्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था कोणी केली हे जनतेला माहित असल्यानेच जनतेने आपल्यावर विश्वास टाकुन आज एवढी गर्दी सत्ताधारांना उत्तर दिल्याचे सांगितले.व आपण अर्ज भरण्यासाठी उशीर का केला हे सांगताना आपण विरोधकांना चकविण्यासाठी “तो”आखलेला डाव असल्याचे सांगून पत्रकारांची टोपी त्यांच्यावरच उडवली.

मात्र सत्ताधारी लोकप्रतिनिधीस त्याची भनक लागल्याने त्यांनी थेट आपल्या तिजोरीची चाव्याच वरिष्ठ नेत्यांच्या ताब्यात देऊन टाकल्याने काळे यांच्यापुढे पेच उभा राहिला व ते भाजप उमेद्वारीपासून वंचित राहिले.परिणाम स्वरूप इकडे राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांचा या तालुक्यातील उमेदवारीसाठी पैसा आणि बाहुबल असलेला उमेदवार दृष्टिपथात येत नसल्याने पेच वाढला होता.अखेर वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्या दुय्यम नेत्यांना उमेदवारी करण्याची तयारी करण्याचे फर्मान काढले होते व तशी तयारीही त्यांनी केली होती.मात्र शेवटच्या क्षणी त्यांचे पक्षाचे योग जुळून आले व त्यांचे अन्य सर्वच दोर कापले गेल्याने ना-ना म्हणत काल दुपारी एक वाजून पंचवीस मिनिटानी आपली उमेदवारी” ए” व “बी” अर्ज जोडून

कोपरगाव विधानसभेसाठी काल तेवीस उमेदवारांनी बत्तीस अर्ज दाखल केले ते पुढील प्रमाणे-दिलीपराव मारुतीराव तिडके (अपक्ष) १ ,कवडे शिवाजी पोपटराव (बळीराजा पार्टी) १ अर्ज, शाह अलिम छोटू (अपक्ष) १ अर्ज, राजेश नामदेवराव परजणे (अपक्ष) २ अर्ज, कोल्हे शितल दिगंबर (हिंदूस्थान जनता पार्टी) १ अर्ज, टेके रावसाहेब चांगदेव (अपक्ष १ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी १) २ अर्ज,आहिरे मगन पांडुरंग (अपक्ष) १ अर्ज,आभाळे नानासाहेब मुरलीधर (अपक्ष) १ अर्ज,लोंढे शरद लक्ष्मण (अपक्ष) १ अर्ज, आशुतोष अशोकराव काळे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी २ अपक्ष २) ४ अर्ज, आढाव नारायण माधवराव (अपक्ष) १ अर्ज,आव्हाड प्रभाकर सिताराम (अपक्ष) १ अर्ज,आगवण ज्ञानदेव देवराम (अपक्ष) १ अर्ज, उकिरडे सुदाम पंढरीनाथ (अपक्ष) १ अर्ज,राजेश सखाहरी परजणे (अपक्ष) १ अर्ज,साळुंके दिपक गणपतराव (अपक्ष) १ अर्ज, माधव सखाराम त्रिभुवन (बहुजन समाज पार्टी) १ अर्ज, काळे अशोक नामदेव (अपक्ष) १ अर्ज

त्यावेळी प्रारंभी त्यांनी आपल्या समर्थकांची मोट डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर बांधली.व त्या नंतर आपल्या पक्षाचे फलक व घोषणा फलक व तत्सम साहित्य हातात घेऊन सवाद्य घोषणांच्या निनादात निवडणूक कार्यालयाकडे कूच केली.त्यावेळी विघ्नेश्वर चौक ते कोपरगाव तहसील कार्यालयापर्यंत गुरुद्वारा रस्ता पूर्ण त्यांच्या कार्यकर्त्यांनी फुलून गेला होता.सर्वत्र राष्ट्रवादीचे फलक व झेंडेच झेंडे सर्वत्र दिसत होते.आपले नामनिर्देशन पत्र निवडणूक अधिकारी राहुल मुंडके यांचेकडे सादर केले आहे.त्यावेळी निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडून संविधानाप्रति वचनबद्ध राहण्याची शपथ घेतली.

सदर प्रसंगी माजी आ. अशोक काळे,पुष्पाताई काळे,स्नेहलता शिंदे,जिल्हा बँकेच्या संचालिका चैताली काळे,कर्मवीर काळे कारखान्याचे उपाध्यक्ष पद्मकांत कुदळे,साई संस्थानचे माजी विश्वस्त अशोक खांबेकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मच्छीन्द्र खिलारी,शहराध्यक्ष सुनील गंगूले,संभाजी काळे,कारभारी आगवन,चंद्रशेखर कुलकर्णी,आदी प्रमुख मान्यवरांसह विविध संस्थांचे पदाधिकारी ,कार्यकर्ते,मतदार हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close