नगर जिल्हा
सावळीविहिर येथे भवानी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी
October 3, 2019
255 1 minute read
संपादक-नानासाहेब जवरे
सावळीविहीर (प्रतिनिधी)
सावळीविहीर येथील प्रसिद्ध व पुरातन श्री भवानी मातेचा नवरात्र उत्सव विविध धार्मीक कार्यक्रमाने मोठ्या उत्साहात साजरा होत असून दररोज दर्शनासाठी महिला व पुरुष भक्तांची मोठी गर्दी वाढत आहे.
सावळीविहिर ग्रामपंचायत हद्दीत गोदावरी उजव्या कालव्याच्या कडेला पुरातन व प्रसिद्ध असे श्री भवानी माता मंदिर या परिसरात प्रसिद्ध आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून भक्तांची येथे मोठी श्रद्धा आहे श्री भवानी मातेचे शेजारी ग्रामस्थांनी नंतर सुमारे पाच फूट उंचीची श्री कालिका मातेची मूर्ती बसवलेली असून ती पूर्वमुखी आहे या दोन्ही देवींच्या समोर होमकुंड व भव्य सभामंडप आहे सभा मंडपासमोर जुन्या दिपवाळीच्या जागी नव्याने सुमारे तीस फूट उंचीची कमळात दिसणारी आकर्षक दीपमाळ उभारण्यात आली असून त्यासाठी सुमारे तीन लाख रुपये खर्च आला आहे. सध्या नवरात्र निमित्त मंदिर सभामंडप दीपमाळ व परिसरात रंगरंगोटी करून आकर्षक पताका लावून आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.येथे नवरात्र निमित्त दररोज सकाळी ग्रंथवाचन सकाळ-संध्याकाळ आरती व विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत येथे दररोज शिर्डी रुई निमगाव निघोज शिंगवे कारवाडी आधी परिसरातून मोठ्या संख्येने भक्त विशेषता महिलावर्ग मोठ्या संख्येने देवीच्या दर्शनाला येत आहेत नवसाला पावणारी देवी भवानी माता समजलेी जात असल्याने येथे अनेक जण नवस करतात नवरात्रीत नवस फेडण्यासाठी कोणी देवीला साडी खणानारळाची ओटी भरतो तर कोणी शेरणी पेढे कापण्या वाटतो मात्र येथे मुक्या प्राण्यांचा नवस फेडण्यासाठी बळी दिला जात नाही वही प्रथा येथे खूप वर्षापासून पाळली जाते येथे नवरात्र निमित्त हार फुलांची प्रसादाची नारळाची खेळणी मिठाईची विविध दुकाने थाटली आहेत सातव्या माळेला येथे मोठी यात्रा भरते यात्रेची जोरदार तयारी सुरू आहे नवरात्र यात्राकाळात येथील जय भवानी तरुण मित्र मंडळ सावळीवीर ग्रामस्थ व भक्तगण मोठे परिश्रम घेत आहेत या देवी मंदिरात काही महिलाही ही घटी बसल्या आहेत यात्राकाळात येथे गर्दी होत असल्याने पोलीस बंदोबस्त वाढवण्याची गरज आहे तसेच टारगट पाकीटमार यांचा भक्तांना विशेषता महिला मुलींना त्रास होऊ नये म्हणून विशेष दक्षता घेणे गरजेचे आहे