कोपरगाव तालुका
कोपरगाव नगरपरिषदेचा शहर प्लॅस्टिक मुक्त करण्याचा संकल्प -मुख्याधिकारी सरोदे
कोपरगाव( प्रतिनिधी )
केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर दिनांक ०२ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या १५० व्या जयंती निमित्त पंतप्रधान यानीं स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात सिंगल युज प्लास्टिक चा वापर बंद करण्याची घोषणा केली. त्या अनुषंगाने समाजातील सर्व घटकांच्या सहभागाने हे ध्येय साध्य करण्यासाठी ११ सप्टेंबर ते २७ ऑक्टोबर २०१९ याकालावधीत स्वच्छता हि सेवा हि मोहीम राबविण्यात येत आहे.त्यानुसार कोपरगाव नगर परिषदेने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये शहरातील शाळा,महाविध्यालयातील विध्यार्थी, शिक्षक वृंद तसेच महिला बचत गटातील महिला,नगरपरिषदेचे अधिकारी कर्मचारी, इतर शासकीय कार्यालयातील कर्मचारी व शहरातील समाजसेवी संघटना यांनी प्लॅस्टिक मुक्त शहर संकल्प महारॅलीत उस्पुर्त सहभाग घेतला.दरम्यान महारॅली पूर्वी भारत रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर प्लॅस्टिक मुक्ती प्रतिज्ञा ग्रहण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.