जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
संपादकीय

कोपरगावात भाजपच्या तिकिटावरून चार उमेदवारांची मारामार,काळेंची मंगळवारी घोषणा!

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी)

राज्याच्या विधानसभेची निवडणूक अवघ्या बावीस दिवासावरून येऊन ठेपली असताना कोपरगावात अद्याप कोण कोणत्या पक्षात आहे हे समजण्यास मार्ग दिसत नाही.भाजपकडून विद्यमान आमदार स्नेहलता कोल्हे,राष्ट्रवादीचे आशुतोष काळे,कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे,व गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे आदी चार प्रमुख इच्छुक उमेदवार आहे.सत्ताधारी भाजपच्या तिकिटासाठी प्रयत्नशील सत्ताधारी गटाची तिकिटासाठी खूपच धावाधाव होत असल्याचे दुर्दैवी चित्र समोर आले आहे.असून प्रमोद लबडे हे हि शिवसेनेकडून गळ टाकून बसलेले आहे.त्यामुळे कोपरगावच्या राजकारणात रंगत वाढत चालली आहे.

राज्याच्या विधानसभेची 288 जागांसाठी निवडणूक 21 ऑक्टोबर रोजी संपन्न होत असून उमेदवारी अर्ज भरण्यास 27 सप्टेंबर पासून प्रारंभ झाला आहे.कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील 79 गावातील मतदारांत पोहचणे हि बाब एवढी सोपी नाही त्यासाठी एकवीस दिवस म्हणजे फार कालावधी नव्हे.त्यामुळे सर्वच उमेदवारांनी या पातळीवर आघाडीवर असणे क्रमप्राप्त आहे.असे असताना या पातळीवर अद्याप सामसुमच दिसत आहे.नाहीं म्हणायला विजय वहाडणे यांनी या पातळीवर आपल्याला भाजकडून तिकीट मिळो अथवा नाही आपण अपक्ष निवडणूक लढवणार अशी डरकाळी फोडून त्या दिशेने प्रचारही सुरु करून जवळपास सर्वच गावे पिंजून काढली आहेत.अद्यापही त्यांचे दौरे सुरूच आहे.त्यानंतर राजेश परजणे, प्रमोद लबडे यांनीही बऱ्यापैकी तयारी चालवली असून त्यांनी आपली हत्यारे परजली आहेत.व लढाईची धामधूम सुरु केली आहे.आपले नामनिर्देशन पत्र भरण्याचा अंतिम दिनांक चार ऑक्टोबर असून भाजपने अन्य राज्यातील विधानसभा पोटनिवडणुकीसाठी पस्तीस जागांची घोषणा केली आहे.तर दुपारी महाराष्ट्रातील काही जागांची घोषणा करण्यासाठी पक्षाध्यक्ष अमित शहा व कार्याध्यक्ष जे. पी.नड्डा व केंद्रीय निवडणूक समितीच्या प्रमुख उपस्थितीत बैठक सुरु असल्याची बातमी आहे.अशा परिस्थितीत कोपरगाव एवढे शांत कसे ? या बाबत तालुक्यात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.नाही म्हणायला आशुतोष काळे हे तसे जवळपास तीन दिवस मुंबईत तळ ठोकून होते.त्यांनी आपली खिचडी शिजवित आणली असून त्यांना राज्यात भाजपची सेनेशी युती झाली नाही तर त्यांची शिवसेनेकडून उमेदवारी नक्की मानली जात आहे.त्यासाठी त्यानि प्रथम लोणीतून मोठी रसद मिळाली होती मात्र मंत्री राधाकृष्ण विखे याना मर्यादित राहण्याचा सूचक इशारा मिळाल्याने त्यांनी या उमेदवारीसाठी हाय खाल्ली आहे.व भाजपवाले त्यांना जे गरजेचे आहे तेच करतात व आपल्याला नाहीही म्हणत नाही.असा दाहक अनुभव त्यांना आल्याने भाजपच्या बाबतीत विखेची अवस्था,” पिराचेच पिराला पडले, फकिराचा कोणी विचार करावा”अशी झाली आहे.

लोकांनी आपल्याला निवडून दिले म्हणजे मनमानी करण्याचा खुला परवाना दिला या समजुतीत वावरणाऱ्यानी जनतेच्या आकांक्षा पायदळी तुडवल्या आहेत.त्यातून त्यांच्या हातून जे प्रपात घडले ते माफीच्या लायकीचे नाही.त्यामुळे मतदारांनी या विधानसभेला भानात राहून मते देण्याची वेळ आली आहे.मागावून पाच वर्ष पच्छाताप करून उपयोग होत नसतो.हजार पाचशे रुपयांनी आपला प्रपंच कधीच सावरत नसतो पण नको त्यास मते दिल्याने बरबाद मात्र नक्कीच होत असतो याचे भान ठेवलेले बरे.

त्यामुळे काळे यांनी आपला मोर्चा सेनेकडे वळवला आहे.त्याच्या गाठी सेना नेत्यांना कसे प्रसन्न करायचे याचा गुरु मंत्र त्यांच्या पिताश्रींना चांगलाच माहिती असल्याने ती,”विद्या” त्यांना येथे पुन्हा कामी आल्याचे मानले जात आहे.त्यासाठी त्यांना आपली तिजोरीचा दरवाजा थोडा किलकिला करावा लागतो एवढंच काय तो प्रश्न ! तो त्यांनी मोकळा केल्याचे वृत्त असून त्यांनी अकरा खोके अशी किंमत मोजल्याचे विश्वसनीय वृत्त हाती आले आहे.जर राज्यात युती राहिली तर मात्र त्यांना राष्ट्रवादी शिवाय अन्य पर्याय राहणार नाही.अशी विश्वसनिय माहिती हाती आली आहे.तर दुसरीकडे विद्यमान लोकप्रतिनिधीस संगमनेर दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी उमेदवारीचा शब्द दिल्याची खबर पक्की दिसत असली तरी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासारखा बनेल मुख्यमंत्री दुसरा झाला नाही या वाक्यात त्यांचे कार्य सामावले आहे.मात्र त्यांच्या येथील लोकप्रतिनिधींच्या प्रसिद्ध झालेल्या छायाचित्रातील देहबोलीत कुठेही आत्मविश्वास असल्याचा लवलेश दिसत नसून उसने अवसानच जास्त दिसत आहे.काल त्यांच्या कार्यकर्त्यांत उमेदवारी मिळाल्याची चर्चा दिसत होती मात्र खात्रीलायक कोणीही माहिती देऊ शकले नाही.लोकसभा निवडणुकीत भाजपने ताकही फुंकून पिण्याची भूमिका घेऊन लोकसभेचे 257 विद्यमान खासदार याना अंगठा दाखवून घरी बसवल्याचा इतिहास नवा नाही.विधानसभा निवडणुकीआधी भाजपने तीन सर्वेक्षणे करून त्यांच्या सर्व 122 जागांचा आढावा घेतला आहे.त्यात जवळपास तीस टक्के उमेदवार नापास झाले आहेत.त्यात कोपरगावचा वरचा क्रमांक आहे.अद्याप दोन सर्वेक्षणाचे निकाल येणे बाकी असून त्यावरच उमेदवाऱ्या निश्चित मानल्या जात आहे.त्याआधी प्रतिमा सुधारण्याची संधी मिळूनही विद्यमान लोकप्रतिनिधींना संधीचे सोने करता आलेले नाही.

असे म्हणतात समाधानाचा मार्ग पोटातून जातो.अर्धपोटी ,उपाशी माणसे,समाधानी राहू शकत नाही.उपाशी माणसाची कणव असणे त्याच्या वेदनांचे भान असणे हीच खरी माणुसकी.ज्या देशाची वा राज्याची जनता समाधानी असते ते कल्याणकारी राज्य मानले जाते.प्रत्येक माणसाची उदरनिर्वाहाची किंवा पोट भरण्याची गरज हा त्याचा हक्क असतो आणि तो त्याला मिळावा यासाठी जाणिवा जागृत असणे हे कल्याणकारी राजाचे कर्तव्य असते या पातळीवर कोपरगावसह पश्चिम महाराष्ट्रातील सहाही जिल्हे व त्यातील तालुके नापास होतील अशी परिस्थिती आहे त्याला कोपरगाव तालुक्याचा अपवाद नाही.

राज्यात युतीला किमान 225 जागा मिळविण्याचा भाजपचा निर्धार आहे.राज्यात राष्ट्रवादी जास्त प्रबळ मनाली जात होती मात्र त्यांनी राज्य बँकेच्या निमित्ताने भाजपने सक्त वसुली संचलनालयाचा योग्य मेळ घालवत झाडाच्या मुळावरच घाव घालून आघाडीच्या नेत्यांना इशारा देण्याचा अचूक टायमिंग साधला आहे.याला भाजपवाल्याना दाद द्यावीच लागेल.शिवाय मित्र पक्ष शिवसेनेचे मोहरे गळाला लावून सेनेवर नियंत्रण मिळविण्यात मुख्यमंत्री यांनी बऱ्यापैकी यश मिळवले आहे.सेनेने दंडाच्या बेटकुळ्या दाखवल्या तर त्यांच्या मागे आमदाररुपी सैन्य राहणार नाही याची खबरदारी घेतलेली दिसत आहे.त्यामुळे सेनेला युती करण्यावाचून पर्याय राहिलेला नाही.याची जाणीव सेना नेतृत्वाला नाही असा मुळीच नाही.त्यांनी पवार संकटात येताच त्यांना दिलासा देण्यासाठी खा.संजय राऊत यांना शरद पवारांच्या भेटीला पाठवून त्यांची सहानुभूती निवडणूक पच्छात राजकारणासाठी उपयोगी पडेल अशी तरतूद केलेली दिसत आहे.तीच बाब मनसे बाबत सेनेने माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींच्या माध्यमातून तीच रणनीती शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व त्यांच्या रणनीतिकारांनी राबवलेली दिसत आहे.म्हनजे आगामी काळात खरा विरोधी पक्ष हा राज्यात शिवसेनाच राहणार असल्याचे अगदी स्पष्ट संकेत मिळत आहेत.

कोपरगावात विद्यमान आमदारांना पराभूत करायचे असल्यास विरोधी इच्छुक उमेदवारांना आपल्या महत्वाकांक्षांना आवर घालून एकास एक उमेदवार देऊनच ते शक्य होण्याची शक्यता आहे.अन्यथा कमी मते मिळूनही सत्ताधाऱ्यांना त्याचा फायदा गत निवडणुकीसारखा मिळण्याचीच जास्त शक्यता वाटत असून या पातळीवर अद्याप कोणीही विरोधी पक्ष नेता पुढाकार घेताना दुर्दैवाने दिसत नाही.

नगर जिल्ह्यात शिवसेनेच्या वाट्याला अहमदनगर,श्रीरामपूर,संगमनेर,पारनेर,अकोले आदी पाच जागा येणार असल्याची माहिती आहे.म्हणजेच अद्याप कोपरगावची जागा भाजपकडे असल्याचे निष्पन्न होत आहे.शिवसेना राज्यात युती तोडण्याच्या मूडमध्ये दिसत नाही उलट मित्रपक्ष भाजपशी युती करून लोकसभा निवडणुकीसारखेच जास्तीच्या जागा निवडणून आणून बहुमतासाठी थोड्या बहुत जागा कमी पडल्या तर त्यासाठी राज्यातील काँग्रेस व राष्ट्रवादीची मदत घ्यायला ते कमी करणार नाही याची खात्री असल्यानेच भाजप जागा वाटप करण्यास जास्तीचा उशीर करून शिवसेनेचा आघाडीशी संपर्क कमी कसा राहील याची खबरदारी घेत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close