गुन्हे विषयक
डाऊच खुर्द आयशर लुटीतील ते आरोपी पोलिसांनी पकडले
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील डाऊच खुर्द ग्रामपंचायत हद्दीत मारुती एर्टीगा कारचा वापर करून 16 सप्टेंबरच्या रात्री भिवंडीकडून औरंगाबाद कडे जाणाऱ्या आयशर ट्रकमधील चालकास धाक दाखवून आठ म्हशींसह सहा लाख 23 हजार पाचशे रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा करणाऱ्या दरोडेखोरांच्या मुसक्या स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी आवळल्या असून त्यांनी राहुल अशोक खरात (वय २२), रा. शिर्डी, किरण अर्जुन आरणे (वय २२ ), रा. डोऱ्हाळे, ता. राहाता व शेख इमरान शेख ईसा (वय २९) , रा. सिल्लोड, औरंगाबाद आदींना अटक केली आहे.त्यामुळे नागरिकांनी पोलिसांचे कौतुक केले आहे
या आधी पोलिसांनी नांदूरखी येथील नितीन पडवळ,भैया पडवळ आदींना अटक केली होती त्यांच्या माध्यमातून पोलिसांनी पुढील कारवाई केली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे कि,लातूर जिल्ह्यातील वरील क्रमांकांचा आयशर ट्रक वरील चालक हज्जू अमीन शेख (वय-22) रा.लामजमा ता.औसा जिल्हा लातूर हा भिवंडी येथून खरेदी केलेल्या प्रत्येकी पंचवीस हजार किमतीच्या एकूण दोन लाख रुपये किमतीच्या आठ म्हशी घेऊन औरंगाबादकडे मध्यरात्रीच्या सुमारास मुंबई-नागपूर राज्य मार्गाने जात असताना त्याला कोपरगाव तालुक्यातील डाऊच खुर्द ग्रामपंचायत हद्दीत आल्यावर एक पांढऱ्या रंगाच्या एर्टीगामध्ये चार अनोळखी आरोपींनी येऊन ती रस्त्यात आडवी घालून चालकास कोयता व अन्य हत्यारांचा धाक दाखवून त्यातील आठ म्हशी,चार लाख रुपये किमतीचा आयशर ट्रक,अठरा हजार रुपये रोख,पाचशे रुपये किमतीचा मोबाईल,असा सहा लाख 23 हजार 500 रुपये किमतीचा ऐवज लुटून नेला होता.या घटनेची ट्रक चालक हज्जू शेख याने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात खबर देऊन गुन्हा क्रं.320/2019 भा.द.वि.कलम 341,363,394,504,506 प्रमाणे दाखल केला होता.पुढील तपास नगर येथीलस्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांकडे सोपवला होता.
या गुन्ह्यातील आरोपी राहाता येथे येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांच्या पथकाने राहाता येथे सापळा रचून आरोपी राहुल खरात व किरण आरणे या दोघांना ताब्यात घेतले. या दोघांकडे चौकशी केली असता त्यांनी ट्रकचालकाकडून चोरलेला मुद्देमाल सिल्लोड येथील व्यक्तीला दिला असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने सिल्लोड येथे जाऊन आरोपी शेख इमरान शेख ईसा याला पकडले. या तिन्ही आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कोपरगाव शहर पोलिस स्टेशनच्या ताब्यात काल सायंकाळी सहाच्या सुमारास दिले आहे.
या आधी पोलिसांनी नांदूरखी येथील नितीन पडवळ,भैया पडवळ आदींना अटक केली होती त्यांच्या माध्यमातून पोलिसांनी पुढील कारवाई केली आहे.