कोपरगाव तालुका
संवत्सर येथे हुंड्यासाठी महिलेचा छळ,पाच आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर ग्रामपंचायत हद्दीतील मनाई वस्ती येथील रहिवासी असलेल्या महिलेचा नवरा अल्ताफ हाशम पटेल,सासरा हाशम चांद पटेल, सासू आयेशा हाशम पटेल,नणंद नसीम याकूब शेख यांनी पहिल्या नवऱ्याकडून मिळालेले एक लाख रुपये आणावेत यासाठी तिला कायम मारहाण करून तिचा शारीरिक,मानसिक छळ करून तिला पंचवीस सप्टेंबर रोजी मारहाण,शिवीगाळ करून दमदाटी केल्याची फिर्याद नफीसा अल्ताफ पटेल हिने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात करण्यात केली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे कि, फिर्यादी महिलेचा पहिला विवाह झाला होता मात्र काही कारणाने तो रद्द होऊन तिचा विवाह काही वर्षांपूर्वी संवत्सर येथील मनाई वस्ती येथील अल्ताफ हाशम पटेल याच्याशी झाला होता.सुरुवातीचे नव्या नवलाईचे नऊ दिवस गेल्यावर त्यांचे किरकोळ कारणावरून खटके उडण्यास प्रारंभ झाला.फिर्यादी महिलेला पहिल्या नवऱ्या पासून फारकत घेण्यासाठी एक लाख रुपये मिळाले होते त्यावर या नव्या नवऱ्याचा डोळा होता त्याने ती रक्कम आपल्याला मिळावी यासाठी तिच्याकडे लकडा लावला होता त्यातून त्यांच्यात वारंवार खटकेही उडत होते.तिला पंचवीस सप्टेंबर रोजी याच कारणावरून मारहाण करून शिवीगाळ केली दमदाटी केली असल्याची फिर्याद सदर महिलेने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं.334/2019 भा.द.वि.कलम 498 (अ),323,504,506,34 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मान गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.ए. व्ही. गवसणे हे करीत आहेत.