आरोग्य
खा.विखे यांनी विनापरवाना रेमडेसिवीर आणले,पोलिसांना न्यायालयाचे कार्यवाहीचे आदेश !
न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
अहमदनगर मतदारसंघाचे खासदार डॉ.सुजय विखे यांनी आपल्या मैत्रीचा वापर करत आपण थेट विशेष विमानाने रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा नगर जिल्ह्यात आणला.या साठ्याचे वाटप बद्दल माहिती चल चित्रफितीद्वारे त्यांनी सामाजिक माध्यमांमार्फत प्रसारित केली.शिर्डी विमानतळावर त्यांनी हा साठा विशेष विमानांमधून उतरविला.तो रेमडेसिवीरचा साठा कोठून आणला त्याची सुरक्षितता अंधारात आहे.सदर साठ्यातील इंजेक्शन त्यांनी साईबाबा संस्थानच्या रुग्णालयाला व राहाता येथील सरकारी दवाखान्याला देखील देखील वाटप केल्याने वाद निर्माण झाला असून तो उच्च न्यायालयाच्या पोहचला असून त्यावर औरंगाबाद खण्डपीठाने पोलिसांना कार्यवाही करण्याचे आदेश दिल्याने वादंग निर्माण झाले आहे.
राज्यात अनेक रुग्णांना खाटा,तर काहींना प्राणवायू,तर अनेकांना रेमडीसीविर हे इंजेक्शन मिळेनासे झाल्याने अनेकांना आपला हकनाक जीव गमवावा लागतं आहे.या इंजेक्शनचा मोठा काळा बाजार सुरु आहे.या पार्श्वभूमीवर नगर दक्षिणेचे खा.सुजय विखे यांनी थेट दिल्लीतून बऱ्याच नोठ्या संख्येने “रेमडीसीविर” हे कोरोनाचा ताप कमी करण्यात अहंम भूमिका निभावणाऱ्या औषधाचे भांडार आणल्याची “राणा भीमदेवी” घोषणा केली होती.व या बाबत,”आपल्यावर कोणी गुन्हे दाखल केले तरी आपण मागे हटणार नाही” अशी “आ बैल मुझे मार”भूमिका घेऊन न्यायिक व्यवस्थेला टोकण्याचे काम केले त्यातून हे प्रकरण उभे राहिले आहे.
देशात कोरोना विषाणूचा आकडा अगदी झपाट्यानं वाढू लागला आहे.नव्या कोरोनाबाधितांचा आकडा काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाही आहे. मागील २४ तासांत भारतात एकूण ०३ लाख ५२ हजार ९९१ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली.आतापर्यंतचा हा सर्वात मोठा आकडा ठरत आहे.
राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा चढता आलेख कायम आहे. राज्यात रविवारी ६६ हजार १९१ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर आज ६१ हजार ४५० कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण ३५ लाख ३० हजार ६० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ८२.१९ टक्के झाले आहे.राज्यात एकूण ०६ लाख ९८ हजार ३५४ सक्रिय रुग्ण आहेत.राज्यात अनेक रुग्णांना खाटा,तर काहींना प्राणवायू,तर अनेकांना रेमडीसीविर हे इंजेक्शन मिळेनासे झाल्याने अनेकांना आपला हकनाक जीव गमवावा लागतं आहे.या इंजेक्शनचा मोठा काळा बाजार सुरु आहे.या पार्श्वभूमीवर नगर दक्षिणेचे खा.सुजय विखे यांनी थेट दिल्लीतून बऱ्याच नोठ्या संख्येने “रेमडीसीविर” हे कोरोनाचा ताप कमी करण्यात अहंम भूमिका निभावणाऱ्या औषधाचे भांडार आणल्याची “राणा भीमदेवी” घोषणा केली होती.व या बाबत,”आपल्यावर कोणी गुन्हे दाखल केले तरी आपण मागे हटणार नाही” अशी “आ बैल मुझे मार”भूमिका घेऊन न्यायिक व्यवस्थेला टोकण्याचे काम केले त्यातून त्यांचे काही हितचिंतक (?) हे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खण्डपीठात गेले असून त्यांनी या कृतीला हरकत घेतली आहे.त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.या बाबत आज सुनावणी होऊन त्यात न्यायालयाने हे आदेश दिले आहे.त्यामुळे नगर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
त्यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की,”१० हजार रेम्डेसिवीर इंजेक्शन चा साठा कोणतेही कायदेशीर परवाना व अधिकार नसताना डॉ.सुजय विखे यांनी गोपनीय व्यक्तीकडून किंवा काळ्या बाजारातुन खरेदी केली असावी सदर रेम्डेसिवीर इंजेक्शनचा साठा भेसळ मुक्त शुद्ध आहे असे प्रमाणपत्र वापराआधी घेतलेले नाही,एवढा मोठा रेम्डेसिवीर इंजेक्शनचा साठा कुठे व कसा वापरला याचा हिशोब देखील कुठे नाही अशा मुद्यांवर सामाजिक कार्यकर्ते अरुण कडू,चंद्रभान घोगरे,बाळासाहेब विखे व दादासाहेब पवार यांनी उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे ऍड सतीश तळेकर यांच्या मार्फत फौजदारी याचिका दाखल करून सदर प्रकरणात खा.डॉ.सुजय विखे यांचावर रेम्डेसिवीर इंजेक्शनचा साठा कोणतेही कायदेशीर परवाना व अधिकार नसताना वाटप केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा अशी मागणी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खण्डपीठात केल्याने वाद निर्माण झाला आहे.
आज दि.२६ एप्रिल २०२१ रोजी यांनी सदर रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा तत्काळ शासनाने जप्त करावा व अहमदनगर जिह्यातील गरजू रुग्णांना जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्या मार्फत समन्यायी पद्धतीने वाटप करावी अशी विनंती याचिकाकर्त्याच्या वतीने करण्यात आली.उच्च न्यायालयाचे न्या. आर.व्ही.घुगे व न्या.बी.यु.देबडवार यांनी,”पोलीस व जिल्हा प्रशासनाला अशा परिस्थितीत जी कायदेशीर कार्यवाही करता आली असती तशी कार्यवाही” करण्याचे आदेश दिली.पुढील सुनावणी २९ एप्रिल रोजी ठेवण्यात आली आहे.
सदर प्रकरणात याचिकाकर्त्यांच्या वतीने ऍड.प्रज्ञा तळेकर,ऍड.अजिंक्य काळे व ऍड.राजेश मेवारा यांनी काम पाहात आहे तर शासनाच्या वतीने ऍड.डी. आर.काळे काम पाहात आहे.