निधन वार्ता
सुहास कंगले यांचे निधन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष दत्तात्रय कंगले यांचे चिरंजीव व कोपरगाव पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेचे माजी अध्यक्ष सुनील कंगले व अनिल कंगले यांचे लहान बंधू सुहास कंगले (वय-५६)यांचे दीर्घ आजाराने नुकतेच निधन झाले आहे.त्यांच्यानिधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
स्व.सुहास कंगले अत्यन्त धार्मिक व मनमिळाऊ स्वभावाचे म्हणून प्रसिद्ध होते.त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी,एक मुलगा,एक मुलगी व जावई असा परिवार आहे.त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.