जाहिरात-9423439946
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राज्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.त्यात रोज हजारो कोरोनाच्या रुग्णांची भर पडत आहे.त्याला कोपरगाव शहर व तालुकाही अपवाद नाही.कोपरगावातून नगर येथे २३५ श्राव तपासणीसाठी पाठवले असून आर.टी. पी.सी.आर.तपासणीत २४ अँटीजन तपासणीत ५५,खाजगी प्रयोग शाळा तपासणीत ३३ असे एकूण ११२ रुग्ण बाधित आढळले आहे.तर १३० जणांना उपचारानंतर सोडून देण्यात आले आहे तर कोपरगावातील चार रुग्णांचे निधन झाले आहे.त्यात कृषिमित्र सोसायटी येथील ७५ वर्षीय महिला,कोपरगावातील ४६ वर्षीय पुरुष,निवारा सोसायटी मधील ६७ वर्षीय महिला,तर अन्य एक ४६ वर्षीय पुरुष आदींचा समावेश आहे.तर ग्रामीण भागातील आपेगाव येथील ७३ वर्षीय महिला,रावंदे येथील ६२ वर्षीय पुरुष व ६० वर्षीय महिला आदी आठ नागरिकांचा समावेश आहे.कोरोना मृत्यूचे तांडव आता गल्ली बोळात आता गोंधळ घालु लागले असल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे त्यामुळे शहर व तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान आज आलेल्या अहवाल गृहीत धरून आज अखेर ०७ हजार ११५ रुग्ण बाधित झाले आहे.शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणात मृत्युदर वाढला असून कोरोनाचे रुग्ण हि मोठ्या प्रमाणात वाढले असल्याने आता कोरोनाने नागरिकांत चांगलीच दहशत निर्माण केली आहे.त्यामुळे आगामी काळात प्रशासनाला सहाय्य करून नागरिकांना आपले प्राण वाचविण्यास मदत करावी लागणार आहे.अन्यथा हे मृत्यूचे तांडव थाम्बविणे अवघड जाणार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ०१ लाख ४२ हजार ५७९ झाली असून सक्रिय रुग्ण संख्या १९ हजार ०४६ झाली आहे.तर आज अखेर पर्यंत ०१ लाख २१ हजार ८८३ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.तर ०१ हजार ६४९ रुग्ण आतापर्यंत दगावले आहे.
कोपरगाव तालुक्यात १९ दिवसात ५० जण दगावले आहे.तर शेकडो जण बाधित झाले आहे.
कोपरगाव शहर व ग्रामीण भागातील बाधित आलेले रुग्ण काही कारणामुळे स्थगित केली आहे..