जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगावात दुसऱ्या दिवशीही सात नागरिकांचा बळी,रुगवाढ मात्र रोडावली

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

राज्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.त्यात रोज हजारो कोरोनाच्या रुग्णांची भर पडत आहे.त्याला कोपरगाव शहर व तालुकाही अपवाद नाही.कोपरगावातून नगर येथे ३१६ श्राव तपासणीसाठी पाठवले असून आर.टी. पी.सी.आर.तपासणीत २९ अँटीजन तपासणीत ९८,खाजगी प्रयोग शाळा तपासणीत ०६ असे एकूण १३३ रुग्ण बाधित आढळले आहे.तर १८९ जणांना उपचारानंतर सोडून देण्यात आले आहे तर कोपरगावातील चार रुग्णांचे निधन झाले आहे.त्यात इंदिरा पथ येथील ६९ वर्षीय पुरुष,अन्य दोन पुरुष वय-७५,४८.निवारा पुरुष वय-७३,ग्रामीण भागातील कोळपेवाडी येथील पुरुष वय-६०,कोकमठाण येथील पुरुष वय-६०,चांदेकसारे येथील पुरुष वय-६८ आदी सात नागंरिकांचा कोरोनाने बळी गेला असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे.मृत्यूचे तांडव आता गल्ली बोळात आता गोंधळ घालु लागले असल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे त्यामुळे शहर व तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.

दरम्यान आज आलेल्या अहवाल गृहीत धरून आज अखेर ०७ हजार ००३ रुग्ण बाधित झाले आहे.शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणात मृत्युदर वाढला असून कोरोनाचे रुग्ण हि मोठ्या प्रमाणात वाढले असल्याने आता कोरोनाने नागरिकांत चांगलीच दहशत निर्माण केली आहे.त्यामुळे आगामी काळात प्रशासनाला सहाय्य करून नागरिकांना आपले प्राण वाचविण्यास मदत करावी लागणार आहे.अन्यथा हे मृत्यूचे तांडव थाम्बविणे अवघड जाणार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.आता पिशवीत पैसे घेऊन हिंडूनही उपचारासाठी खाटा मिळणे अवघड बनले आहे.अनेकांना व्हेंटिलेटर व प्राणवायूसाठी बाहेरचे तालुके व जिल्ह्यात उपचारासाठी धाव घ्यावी लागत आहे हि गंभीर बाब आहे.

नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ०१ लाख ३९ हजार ५८७ झाली असून सक्रिय रुग्ण संख्या २१ हजार ६३४ झाली आहे.तर आज अखेर पर्यंत ०१ लाख १६ हजार ३३२ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.तर ०१ हजार ६२० रुग्ण आतापर्यंत दगावले आहे.

कोपरगाव तालुक्यात अठरा दिवसात ४२ जण दगावले आहे.तर शेकडो जण बाधित झाले आहे.

कोपरगाव शहरात आज बाधित आलेले ३४ रुग्ण पुढील प्रमाणे-

सुभद्रानगर पुरुष-73,33,
लक्ष्मीनगर पुरुष-53,30,महिला-50,
खडकी पुरुष-23,46,महिला-60,
सम्यक नगर महिला-30,
मार्केट रोड पुरुष-32,
महिला कॉलनी महिला-32,
आढाव वस्ती पुरुष-55,महिला-45,28,
गांधीनगर पुरुष-23,
येवला रोड पुरुष-36,
स्टेशन रोड पुरुष-55,
मोहनीराज नगर महिला-40,
सराफ बाजार पुरुष-28,
इंदिरानगर महिला-35,
कोपरगाव शहर पुरुष-30,31,56,24,26,महिला-55,30,
निवारा पुरुष-33,
दत्तनगर पुरुष-23,महिला-42,
गजानन नगर पुरुष-23,
अन्नपूर्णा नगर महिला-63,
गोदाम गल्ली पुरुष-26,
नाईकवाडे हॉस्पीटल महिला- 60 आदींचा समावेश आहे.

कोपरगाव ग्रामीण भागातील आज आढळलेले ९९ रुग्ण पुढील प्रमाणे –
चांदगव्हाण पुरुष-23,
देर्डे-कोऱ्हाळे पुरुष-58,60,महिला-35,
चांदेकसारे पुरुष-30,26,महिला-42,
शिंगणापूर पुरुष-23,27,महिला-20,
रवंदे महिला-28,22,10,
कोकमठाण पुरुष-60,
ब्राह्मणगाव पुरुष-35,21,70,38,महिला-43,36,
टाकळी पुरुष-35,45,38,18,महिला-12,42,36,
जेऊर कुंभारी पुरुष-55,महिला-21,
सोनारी पुरुष-32,
शहाजापूर महिला-61,
येसगाव पुरुष-32,
धारणगाव पुरुष-21,19,40,12,30,महिला-32,10,
सांगवी महिला-55,
संजीवनी महिला-22,
दहेगाव पुरुष-55,महिला-19,40,25,50,24,
बोलकी पुरुष-42,
करंजी पुरुष-32,8,महिला-28,37,
गोधेगाव पुरुष,30,48,15,42,महिला-35,07,45,18,19,
भोजडे पुरुष-20,
पढेगाव महिला-17,
सावळगाव पुरुष-32,
शिरसगाव पुरुष-39,
वेस महिला-36,
पोहेगाव पुरुष-29,6,18,महिला-55,37,
कारवाडी पुरुष-32,41,
हंडेवाडी पुरुष-28,60,महिला-39,21,30,
बक्तरपुर पुरुष-70,
कोळगाव थडी महिला-45,
चासनळी पुरुष-49,21,40,51,महिला-45,
वडगाव महिला-55,
धामोरी महिला-65,
शहाजापूर पुरुष-55,
साखरवाडी महिला-10,
कोळपेवाडी पुरुष-26,24,8,महिला-18,45,10,
सुरेगाव पुरूष-60,
मढी पुरुष-30,महिला-28,
माहेगाव पुरुष-33,
संवत्सर पुरुष-39 आदींचा समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close