जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव तालुक्यात मोठी चोरी,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील वारी ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या जगताप वस्ती येथे काळ रात्री दहा ते पहाटे एक वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यानी दरवाज्याचे कुलूप तोडून आतील दरवाजा उघडून कपाटातील सोन्याचे दीड तोळ्याचे मणी मंगळसूत्रासह अन्य दागिने असा ०२ लाख ०४ हजार ७०० रुपयांचा ऐवज चोरून पोबारा केल्याने वारी शिवारात खळबळ उडाली आहे.

वर्तमानात कोरोना विषाणूचे संकट गतवर्षांपासून घोंघावत असून जवळपास ७४ नागरिकांचे तालुक्यातून बळी गेले आहे.त्यामुळे जनतेत भीतीचे वातावरण आहे.या शिवाय सध्या उन्हाळा कडक असल्याने ग्रामस्थ घराबाहेर उघड्यावर झोपतात.या संधीचा चोरटे पाळत ठेऊन संधी साधत असल्याचे वारंवार दिसून आले आहे.अशीच घटना वारी ग्रामपंचायत हद्दीत नुकतीच घडली आहे त्यामुळे ग्रामस्थांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

सदरचे सवित्तर वृत्त असे की,वर्तमानात कोरोना विषाणूचे संकट गतवर्षांपासून घोंघावत असून जवळपास ७४ नागरिकांचे तालुक्यातून बळी गेले आहे.त्यामुळे जनतेत भीतीचे वातावरण आहे.या शिवाय सध्या उन्हाळा कडक असल्याने ग्रामस्थ घराबाहेर उघड्यावर झोपतात.या संधीचा चोरटे पाळत ठेऊन संधी साधत असल्याचे वारंवार दिसून आले आहे.अशीच घटना वारी ग्रामपंचायत हद्दीत नुकतीच फिर्यादी बाळासाहेब धोंडीराम जगताप यांचे वस्तीवर घडली असून ते शुक्रवार दि.१६ एप्रिल रोजी आपल्या कुटुंबियासंवेत घराबाहेर झोपलेले असताना त्यांच्या घरावर काही अज्ञात चोरट्यानी पाळत ठेऊन घराच्या दरवाज्याचे कुलूप तोडून आतील दरवाजा उघडला व कपाटातील सुमारे ६३ हजार रुपये किमतीचे जुने वापरते सोन्याचे मनीं मंगळसूत्र किंमत अंदाजे ३७ हजार ५०० रुपयांचा सर सव्वा तोळा,हजार ५०० रुपये किमतीचे झुबे ५ ग्रॅम सोन्याचे,०१ हजार ५०० रुपये किमतीची छोटी पोत ३ ग्रॅम सोन्याचे,२ हजार ८०० रुपये किमतीचे जोडे, ७ भार चांदीचे ४०० रुपये किमतीचे ओमपान अर्धा ग्रॅम सोन्याचे,६ हजार रुपये किमतीची नथ २ ग्रॅम सोन्याचे,६०० कानातले बाळया १ ग्रॅम सोन्याच्या, ३०० रुपये किमतीची अंगठी अर्धा ग्रॅम सोन्याची,२ हजार ८०० रुपये किमतीचे ब्रासलेट ७ भार चांदीचे, ९ हजार रुपये किमतीचे छोटया बाळाची साखळी ३ ग्रॅम सोन्याची, ९ हजार अंगठी ३ ग्रॅम सोन्याची,३०० रुपये किमतीच्या दोन अंगठया अर्धा भाराचे चांदीच्या, ९ हजार रुपये किमतीचे झुबे अडीच ग्रॅम सोन्याचे वजणाचे, ६० हजार रोख रक्कम त्यात १००,२००,५०० रुपये दराच्या नोटा असा ०२ लाख ०४ हजार ७०० रुपयांचा एकूण ऐवज लंपास केला असून त्या अंतर त्यांनी पोबारा केला आहे.

दरम्यान या चोरीची गंभीर दखल शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव,पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी घेतली असून रात्रीच त्यांनी घटनास्थळी श्वानपथक पाचारण केले असून चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे.मात्र त्यानां अपयश आले आहे.या बाबत फिर्यादी बाबासाहेब जगताप यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

कोपरगाव तालुका पोलिसानी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.११५/२०२१ भा.द.वि.कलम ४५४,३८० प्रमाणे अज्ञात चोरट्याविरुद्ध दाखल केला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन इंगळे हे करीत आहे.या घटनेने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.व वस्तीवर राहणाऱ्या ग्रामस्थांत व शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close