आरोग्य
कोरोना नियंत्रणासाठी केंद्रीय पथकाकडून कोपरगावात पहाणी
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात कोरोना उपाययोजना संदर्भात केंद्रीय पथकातील डॉ.एन.गिरीशराव आणि डॉ.सुशील गुरीया या दोन सदस्यांनी कोपरगावातील कोविड केअर सेंटर,(एस.एस.जी.एम.काॅलेज, कोपरगाव) व डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर (ग्रामीण रुग्णालय कोपरगाव),येथे भेट देवून आढावा घेतला.तसेच लसीकरण केंद्रावर प्रत्यक्ष कामकाजाची माहिती जाणून घेतली.डॉ.राव हे बंगलुरु येथील एन आय एन एम ए.संस्थेत शास्त्रज्ञ आहेत.तर डॉ.गुरीया हे दिल्ली येथील एस.जे.एस.संस्थेत वरिष्ठ तज्ञ म्हणून कार्यरत आहे.
कोपरगाव तालुक्यात कोरोना उपाययोजना संदर्भात केंद्रीय पथकातील डॉ.एन.गिरीशराव आणि डॉ.सुशील गुरीया या दोन सदस्यांनी कोपरगावातील कोविड केअर सेंटर,(एस.एस.जी.एम.काॅलेज, कोपरगाव) व डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर (ग्रामीण रुग्णालय कोपरगाव),येथे भेट देवून आढावा घेतला आहे.
या प्रसंगी जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ.संदिप सांगळे, अतिरिक्त जिल्हा शल्याचिकित्सक डॉ.संजीव बेळंबे, जिल्हा सर्व्हेक्षण अधिकारी डॉ.दादासाहेब साळुंके,साथ रोग शास्त्रज्ञ डॉ.करण नागपुरकर, उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे हे त्यांचे समवेत होते.
या भेटीत संस्थानिक विलिनीकरण,रुग्णाचे संपर्कातील व्यक्तींची चाचणी,प्रतिबंधित क्षेत्र या सह कोरोना संसर्ग प्रादुर्भाव नियंत्रणासाठी कोपरगाव तालुक्यातील उपाययोजना संदर्भात माहिती जाणून घेतली आहे.
या प्रसंगी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले,गटविकास अधिकारी सचिन सुर्यवंशी,मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते,विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ.वैशाली बडदे(आव्हाड), ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.कृष्णा फुलसौंदर, शहरी आरोग्य अभियानच्या डॉ.गायत्री कांडेकर, आपत्ती व्यवस्थापन समन्वयक सुशांत घोडके,साथ नियंत्रण अधिकारी सचिन जोशी,उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे,समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.अरुणा गाताडे,डॉ.वर्षा मेमाणे,डॉ.संजीवनी तोडकर यांचे सह आरोग्य विभाग कर्मचारी, कोपरगाव नगरपरिषद कर्मचारी, सफाई कामगार,पंचायत समिती कर्मचारी यांचे सह कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी नियुक्त विविध खातेनिहाय अधिकारी उपस्थित होते.
या प्रसंगी लसीकरण केंद्रावर प्रत्यक्ष कामकाज करणाऱ्या कर्मचारी यांचे कामकाजाची प्रशंसा करुन त्यांचे सर्वांचे वतीने प्रातिनिधिक स्वरूपात आरोग्य सहाय्यीका बी.बी.जाधव यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला आहे.