सण-उत्सव
महात्मा ज्योतीबा फुले यांची जयंती साधेपणाणे साजरी करा-आवाहन
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
दरवर्षी प्रमाणे यंदाही अकरा एप्रिल रोजी थोर समाज सुधारक महात्मा ज्योतीबा फुले यांची जयंती जवळ आलेली असुन जगभरासह आपल्या अहमदनगर जिल्हातही कोरोना या विषाणुने मोठे थैमान घातले आहे.कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी सामाजीक अंतर पाळणे कटाक्षाने गरजेचे आहे.त्या पार्श्वभुमीवर सर्वांनी महात्मा फुले यांची जयंती साधेपणाने साजरी करावी असे आवाहन श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य,अहमदनगर उत्तर नगर जिल्हाध्यक्ष मुकुंद काळे यांनी केले आहे.
“थोर समाजसुधारक महात्मा ज्योतीबा व क्रांतीज्योती सावित्रीफुले यांनी स्त्री शिक्षणाबरोबर सामाजीक आरोग्यालाही अनन्य साधारण महत्व आपल्या कार्यातुन दिलेले आहे.तत्कालीन परिस्थितीत पुण्यात प्लेगच्या साथीने नागरीकांचे आरोग्य धोक्यात आलेले असताना,प्रसंगी जिवीताचाही विचार न करता नागरीकांचे जीव वाचावे यासाठी फुले कुटुंबीयांचा त्याग व समर्पण हे आजच्या कोरोना महामारीशी लढण्यासाठी आपण सर्वांनी आदर्श व प्रेरणादायी मानावे”मुकुंद काळे जिल्हाध्यक्ष उत्तर नगर जिल्हा माळी युवक संघ.
थोर समाजसुधारक महात्मा ज्योतीबा व क्रांतीज्योती सावित्रीफुले यांनी स्त्री शिक्षणाबरोबर सामाजीक आरोग्यालाही अनन्य साधारण महत्व आपल्या कार्यातुन दिलेले आहे.तत्कालीन परिस्थितीत पुण्यात प्लेगच्या साथीने नागरीकांचे आरोग्य धोक्यात आलेले असताना,प्रसंगी जिवीताचाही विचार न करता नागरीकांचे जीव वाचावे यासाठी फुले कुटुंबीयांचा त्याग व समर्पण हे आजच्या कोरोना महामारीशी लढण्यासाठी आपण सर्वांनी आदर्श व प्रेरणादायी मानावे.ज्या महापुरुषांनी आपल्यावर समाजरक्षणाचे संस्कार घालुन दिलेले आहेत.त्याच महापुरुषांच्या जयंती दिनी त्यांचे विचार आदर्श माणुन कुठेही गर्दी न करता शासनाचे नियम न मोडता महात्मा ज्योतीबा फुलेंची जयंती घरात राहुन आपल्या कुटुंबीया समवेत साधे पणाणे साजरी करावी.
कोरोना लसीकरण सर्वांनी प्राधान्याने करुन घ्यावे,मुखपट्या,प्रतिबंधात्मक औषधे,सुरक्षित अंतर आदींचे काटेकोर पालन करावे आणि संपुर्ण जगाला या माहामारीतुन बाहेर पडण्यासाठी आपण सर्वांनी सामाजीक जबाबदारी व कर्तव्य पार पाडावे.
श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य,संस्थापक अध्यक्ष सचिन गुलदगड,कोपरगांव महात्मा फुले मंडळाचे अध्यक्ष प्रदिप नवले,नगरसेवक वैभव गिरमे,कोपरगांव तालुकाध्यक्ष अशोक माळवदे,शहराध्यक्ष शेखर बोरावके,उपाध्यक्ष संतोष रांधव,कार्याध्यक्ष डॉ.मनोज भुजबळ,सचिव योगेश ससाणे,संपर्क प्रमुख संदिप डोखे,शहर ऊपाध्यक्ष मनोज चोपडे,अनंत वाकचौरे,देवेश माळवदे,सुनिल मंडलिक आदींसह सर्व पदाधिकारी बंधु भगिनींच्या वतीने हे आवाहन करण्यात येत असल्याचे प्रतिपादन शेवटी जिल्हाध्यक्ष काळे यांनी केले आहे.