कोपरगाव तालुका
सोमैय्या महाविद्यालयातील विद्यार्थिनींचे लक्षवेधी यश
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
जिल्हा परिषद अहमदनगरच्या शिक्षण विभागातर्फे १४ नोव्हेंबर रोजी बाल दिवसानिमित्त आयोजित विविध स्पर्धांचे निकाल हाती आले असून त्यात नेहरूंच्या जीवनावरील डॉक्युमेंट्री व्हिडिओ स्पर्धेत स्थानिक के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयातील बारावी कला शाखेतील विद्यार्थिनी कु.दिव्या सुनील साबणे या विद्यार्थिनीच्या विविध स्पर्धेस तीन पुरस्कार प्राप्त झाले आहे.तिच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
बाल दिनानिमित्त आयोजित सप्ताह अंतर्गत अहमदनगर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व वर्गातील विद्यार्थ्यांसाठी नेहरूंच्या जीवनावर भाषण,पत्र लेखन,स्वलिखित काव्य-वाचन,नाट्यछटा,एकपात्री प्रयोग,पोस्टर व निबंध स्पर्धा,नेहरूंच्या जीवनावर डॉक्युमेंटरी व्हिडिओ अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.त्यापैकी वरील स्पर्धांमध्ये कु.दिव्या साबणे हिने हे यश मिळवले आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,दि.१४ नोव्हेम्बर रोजी नगर जिल्हा परिषद शिक्षण विभागातर्फे विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या त्यात तिने बनवलेल्या एक व्हिडिओला तालुकास्तरावर प्रथम क्रमांकाचे पारितोषिक(त्यात रु. १५०० व प्रमाणपत्र ) तसेच ‘स्वातंत्र्यसंग्रामातील नेहरूंचे योगदान’ या विषयासाठीच्या निबंध स्पर्धेत तृतीय क्रमांकाचे पारितोषिक ( रु.७५०व प्रमाणपत्र ) तसेच जिल्हास्तरीय स्पर्धेत याच निबंधासाठी तिला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक ( रु.१५००/- व प्रमाणपत्र ) प्राप्त झाले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव व के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.बी.आर.सोनवणे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
दि. ८ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने संपूर्ण राज्यात ‘बाल दिवस सप्ताह’ साजरा करण्यात आला होता.त्या सप्ताह अंतर्गत अहमदनगर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व वर्गातील विद्यार्थ्यांसाठी नेहरूंच्या जीवनावर भाषण,पत्र लेखन,स्वलिखित काव्य-वाचन,नाट्यछटा,एकपात्री प्रयोग,पोस्टर व निबंध स्पर्धा,नेहरूंच्या जीवनावर डॉक्युमेंटरी व्हिडिओ अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.त्यापैकी वरील स्पर्धांमध्ये कु.दिव्या साबणे हिने लक्षवेधी यश संपादन करून महाविद्यालयाचा लौकिक वाढविला आहे.
तिच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य,उपप्राचार्य, कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे,सचिव ऍड.संजीव कुलकर्णी, विश्वस्त संदीप रोहमारे,कार्यालयीन अधिक्षक डॉ.अभिजीत नाईकवाडे यांनी विशेष अभिनंदन केले आहे.सदर विद्यार्थिनीस त्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.बी.आर.सोनवणे,सांस्कृतिक विभाग प्रमुख सूर्यवंशी ए.एफ.,जाधव डी.जे.,मोरे बी.व्ही.,श्रीमती निळेकर मॅडम यांचे विशेष मार्गदर्शन मिळाले होते.