आरोग्य
वाढत्या कोरोना साथीच्या पार्श्वभामीवर नागरिकांना मोफत अन्नधान्याची गरज-आवाहन
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरंगवसह राज्यात मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्णसंख्या वाढली असून आता शासनाने पुन्हा एकदा टाळेबंदी जाहीर केली असल्याने नागरिकांच्या रोजी रोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यामुळे या पार्श्वभूमीवर शासनाने आर्थिक दुर्बल घटकांना पुन्हा एकदा आपल्या तिजोरीतून अन्नधान्य उपलब्ध करून देण्याची मागणी कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांनी अन्न नागरी पुरवठा मंत्री यांचेकडे केली आहे.
“महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण राज्यात गेल्या २४ तासात तब्बल ५७ हजार ०७४ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. राज्यात मागील २४ तासांत कोरोनामुळं २२२ रुग्णांचा मृत्यू झाला असून, २७,५०८ रुग्णांनी कोरोनावर मातही केली आहे.त्याला कोपरगाव विधानसभा मतदारसंघ अपवाद नाही कोपरगाव विधानसभा मतदार संघात देखील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढली असल्याने आता रोजगाराचा प्रश्न निर्माण होणार आहे”-आ.आशुतोष काळे,
देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येने आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडले असून गेल्या चोवीस तासात देशात एक लाखांहून जास्त नवीन कोरोना रुग्णांची भर पडली आहे तर ४७८ जणांचा मृत्यू झाला आहे. या आधी गेल्या वर्षी १६ सप्टेंबर २०२० ला देशातील सर्वात जास्त म्हणजे ९७,हजार ८९४ रुग्णांची भर पडली होती.आतापर्यंत एक लाख ६५ हजार रुग्णांचा मृत्यू केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या वाढून आता एक कोटी २५ लाख ८९ हजार ६७ इतकी झाली आहे. देशात सक्रीय रुग्णांची संख्याही वाढत असून ती आता सात लाख ४१ हजार ८३० इतकी झाली आहे. रविवारी ५२ हजार ८४७ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता एक कोटी १६ लाख ८२ हजार १३६ इतकी झाली आहे. देशात आतापर्यंत एक लाख ६५ हजार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशात कोरोना लसीकरणाचा वेग वाढला असून पर्यंत सात कोटी ९१ लाख ०५ हजार १६३ लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे.महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण राज्यात गेल्या २४ तासात तब्बल ५७ हजार ०७४ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. राज्यात मागील २४ तासांत कोरोनामुळं २२२ रुग्णांचा मृत्यू झाला असून, २७,५०८ रुग्णांनी कोरोनावर मातही केली आहे.त्याला कोपरगाव विधानसभा मतदारसंघ अपवाद नाही कोपरगाव विधानसभा मतदार संघात देखील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढली आहे.त्यामुळे अडचणीची परिस्थिती निर्माण होऊन नागरिकांना देखील कोरोनाची बाधा होईल या भीतीने नागरिक घराबाहेर पडत नाही.अशा परिस्थितीत नागरिकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असून नागरिकांना तातडीने रेशनवर मोफत किंवा अल्पदरात अन्नधान्य उपलब्ध करून द्यावे अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री ना.छगन भुजबळ यांच्याकडे दिलेल्या निवेदनात केली आहे.
त्यांनी मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की,कोविड-१९ चा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे.शासनाच्या वतीने सर्व प्रकारच्या उपाययोजना केल्या जात आहे.कोविड-१९ चा वाढता धोका लक्षात घेऊन शासनाकडून नुकतेच काही निर्बंध घालण्यात आले आहे.याचा परिणाम साहजिकच नागरिकांच्या जीवनावर होत असून आर्थिक अडचणी निर्माण होणार आहेत.मागील वर्षी अचानक करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक गरीब कुटुंबांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे.त्यामुळे सर्वसामान्य नागरीकांच्या जीवनात अनेक अडचणी निर्माण होऊन त्यांच्यापुढे रोजच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता.अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी नागरिकांना रेशनवर अन्नधान्य उपलब्ध झाल्यास नागरिकांना काहीसा दिलासा मिळू शकतो. त्यासाठी मतदार संघातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या नागरिकांसाठी रेशनवर गहू, तांदूळ यांच्याबरोबरच तूरडाळ,चणाडाळ,साखर,खाद्यतेल मोफत किंवा अल्पदरात उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी आ. काळे यांनी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री ना. भुजबळ यांच्याकडे शेवटी केली आहे.