कोपरगाव तालुका
महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरवण्याचे आमदारांचे आश्वासन हवेत विरले- आशुतोष काळे
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी)
गत विधानसभा निवडणुकीच्यावेळी महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरवणार असल्याचे आश्वासन तालुक्याच्या आमदारांनी मुर्शतपूरच्या महिलांना दिले होते. मात्र आजही महिलांच्या डोक्यावर हंडा अजून तसाच असून या हंड्यावर हंड्याची भर पडली असून महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविण्याचे दिलेले आश्वासन हवेतच विरले असल्याची टीका कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे यांनी मुर्शतपूर येथे एका कार्यक्रमात बोलतांना केली.
कोपरगाव तालुक्यातील मुर्शतपुर ग्रामपंचायतीच्या १४ व्या वित्त आयोगातून मंजूर इनामबारे ते रासकर वस्ती रस्ता खडीकरण, म्हसोबानगर रस्ता खडीकरण व काँक्रीटीकरण तसेच दलित वस्ती सुधार योजनेतून आमीननगर रस्ता काँक्रीटीकरण, मुर्शतपुर फाटा रस्ता काँक्रीटीकरण व डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर रस्ता काँक्रीटीकरण कामाचे आशुतोष काळे यांच्या शुभहस्ते भूमिपूजन करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोपरगाव पंचायत समितीच्या सभापती अनुसया होन या होत्या.
सदर प्रसंगी पंचायत समितीचे उपसभापती अनिल कदम, रोहिदास होन, विष्णू शिंदे, साधना दवंगे, भाऊसाहेब शिंदे, गणपत धुळे, सोपान मोरे, उपसरपंच अजित माळी, सर्व ग्रामपंचायत सदस्य, नितीन शिंदे, डॉ. अनिल दवंगे, काकासाहेब शिंदे, अजित जावळे, सीताराम शिंदे, नवनाथ दवंगे, सुभाष दवंगे, दीपक केकाण, गणेश रणशूर, आबासाहेब ठोळे, दत्तू बागुल, पप्पू भोजने, सतीश रणशूर, संदीप बारवकर, अभिषेक शिंदे, जालिंदर शिंदे, दिलीप गोसावी, माणिक शिंदे, संजय दवंगे,रोहिदास मोरे, भाऊराव थोरात आदी मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले कि,निवडून येण्यापूर्वी तालुक्याच्या आमदारांनी महिलांना तुमच्या डोक्यावरचा हंडा उतरवणार असल्याचे दिलेले आश्वासन पूर्ण झालेच नाही व आजही महिलांना पाण्यासाठी पायपीठ करावी लागत आहे. काळे गटाकडे सत्ता आल्यामुळे मुर्शतपूर मध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे होत असल्याच्या दावा त्यांनी केला. यापुढेही असाच विकास कामांचा धडाका सुरु राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत संधी द्या. तुमचे पाण्याचे प्रश्न मार्गी लावतो अशी ग्वाही त्यांनी शेवटी उपस्थितांना दिली.