कोपरगाव तालुका
माजी आमदारांनी केलेले आरोप अर्धवट माहितीवर-नगराध्यक्ष वहाडणे
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव नगरपरिषद हद्दीत होणार असलेल्या खुले नाट्यगृहाचे कामाचा निधी हा कोपरगाव नगरपरिषदेच्या पाठपुराव्याने नगरपरिषदेच्या इमारतीला वर्ग झाला असल्याची माहिती देत माजी आमदार यांनी केलेला दावा निव्वळ खोटा असल्याचे प्रतिपादन कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वाहाडणे यांनी केला आहे.
कोपरगाव नगरपरिषेच्या नाट्यगृहाला दोन कोटींचा निधी मंजूर केल्याचा दावा माजी आ.कोल्हे यांनी केला होता.मात्र येवला नाका येथील जपसंपदा विभागाची जागा मिळणे अशक्य झाल्याने हा निधी परत जाण्याचा धोका निर्माण झाला असल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे.म्हणून पालिकेने हा निधी थोपविण्यासाठी प्रयत्न सुरु केले मात्र यावरूनही स्रेय वाद निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष विजय वाहाडणे यांनी हे प्रसिद्धी पातर्क प्रसिद्धीस दिले आहे.त्यात त्यानी पुढे म्हटले आहे की,”कोपरगावात बंदिस्त नाट्यगृह व्हावे यासाठी आपण अनेक वेळा माजी मंत्री विनोद तावडे यांना भेटून निधीची मागणी केली.दि.२० नोव्हेंबर २०१७ ला ०२ कोटी रू. वैशीष्ट्यपूर्ण निधी मंजूर झाला.सर्वे.न.२३७ मधील ४० आर जागा बंदिस्त नाट्यगृहासाठी मिळावी अशी मागणी कोपरगाव नगरपरिषदेने दि.१७ जानेवारी २०१८ व १० ऑगष्ट २०१८ ला कार्यकारी अभियंता,नाशिक पाटबंधारे विभाग यांचेकडे केली.दि.०५ जानेवारी २०१९ ला २३७ मधील जागेचा लांबी रुंदी असलेला नकाशा मागणी पत्र भूमी अभिलेख यांना दिले होते.या बाबत जानेवारी २०१९ मध्ये तीन स्मरणपत्र,साहायक अभियंता गोदावरी डावा कालवा उपविभाग कोपरगाव यांनाही दिले.दि.३० जानेवारी २०१९ रोजी कार्यकारी अभियंता नाशिक यांना पत्र पाठवून भाडेपट्टा करारनामा मसुदा व भाडे आकारणीचा दर देण्याची मागणी केली.दि.१८ फेब्रुवारी २०१९ रोजी सर्वसाधारण सभेत तसा ठरावही (क्र.२०) केला.वारंवार मागणी-पाठपुरावा करूनही करारनामा मसुदा-भाडेपट्टा आकारणी दर उपलब्ध होत नाही म्हणून दि.१७ मे २०१९ व दि.१६ जुलै २०१९ रोजी पत्र देऊन त्यावेळच्या आ.कोल्हे यांना यात लक्ष घालण्यासाठी विनंती केली होती.असेच पत्र जिल्हा प्रशासन अधिकारी,अहमदनगर यांना पाठवून सहकार्य करण्याचे सुचविले होते.दि.२४ जानेवारी २०२० व२४ जून २०२० रोजी पुन्हा नाशिक पाटबंधारे विभाग यांना मागणी पत्र दिले,भेटही घेतली.निधी परत जाण्याचा धोकाही सांगितला.आ.आशुतोष काळे व पाटबंधारे विभागासोबत झालेल्या बैठकीत सर्वे नं.२३७ ऐवजी स.नं.१९३५ व १९३९ जागेपैकी एक एकर क क्षेत्रात सुसज्ज नाट्य करावे असा निर्णय झाला.दि.२८ जुलै २०२० रोजी पाटबंधारे विभाग,नाशिक यांनी तीस वर्षाचे भाडे कराराने जागा हस्तांतरण व पाच वर्षाचे जागा आगाऊ भाडेपट्टा बाबत पत्र दिले.प्रती चौ.मी.चार हजार रू.प्रमाणे एकूण रुपये ०१ कोटी ५२ लाख ५४ हजार.दि.१३ ऑक्टोबर २०२० ला प्रधान सचिव,जलसंपदा विभाग यांना भाडे कमी करून नाममात्र भाडे घ्यावे अशी विनंतीही केली होती.पालिकेला २५ ते ३५ लाख रूपये वार्षिक भाडे देणे नगरपरिषदेला आर्थिकदृष्टीने परवडणारे नाही हे उघड होते.व तशी विनंती प्रधान सचिव,नगरविकास यांनाही केली होती. पण २०१८-१८ चा मंजूर निधी.३१ मार्च आधी खर्च न झाल्यास निधी परत जाण्याचा धोका होता.म्हणून हा मंजूर निधी कोपरगाव नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीसाठी वळविण्यात यावा असे शासनास आपण कळविले होते.दि.२७ जानेवारी २०२१ ला तसे पत्र नगरविकास राज्य मंत्री ना.प्राजक्त तनपुरे यांनाही दिले.अहमदनगर येथील बैठकीत आपण नगरविकास मंत्री ना.एकनाथ शिंदे व प्रधान सचिव श्री पाठक यांच्याकडेही” हा निधी परत जाऊ न देता प्रशासकीय इमारत बांधकासाठी वापरण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली. आपण व मुख्याधिकारी व आ.काळे यांनी प्रयत्न केल्यानेच दोन कोटी निधी परत गेलेला नाही याचे भान माजी आमदारांना नाही.असा आरोप वहाडणे यांनी केला असून राज्यात भाजपाची सत्ता असतांनाही भाडेपट्टा करारनामा,मसूदा करून घ्यायला तुम्ही नगरपरिषदेला मदत केली नाही.जाणीवपूर्वक “वहाडणे ” यांना श्रेय मिळू नये तुम्ही सहकार्य केलेले नाही.नाट्य रसिकांबद्दल खोटा कळवळा दाखवू नका.तुम्ही बहुमताच्या जोरावर नुकतेच खुले नाट्यगृह नूतनीकरण काम (रू.९६ लाख) नामंजूर केलेले आहे.तुम्हाला कोपरगावचे नाट्य कलावंत व रसिक माफ करणार नाहीत.तुमच्या राजकिय नाट्याचा पडदा पडलेला आहे असा टोला लगावला आहे.नाट्यगृहाचा निधी आपण माझ्या घरासाठी वापरणार नसून तुम्ही अर्धवट निधी आणून घाईघाईने कोनशीला लावलेल्या प्रशासकीय इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यासाठीच वापरणार असल्याचा टोलाही नगराध्यक्ष वहाडणे यांनी शेवटी लगावला आहे.