कोपरगाव तालुका
कमलबाई सोळसे यांचे निधन
संपादक-नानासाहेब जवरे
संवत्सर (वार्ताहर) दि. १२ सप्टेंबर २०१९ संवत्सर येथील कार्यकर्ते व गोदावरी खोरे दूध संघाचे माजी संचालक गोरखनाथ सोळसे यांच्या पत्नी कमलबाई सोळसे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्युसमयी त्या ४७ वर्षाच्या होत्या. संवत्सर येथे गोदावरी काठावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यविधी प्रसंगी पंचायत समितीचे माजी सदस्य कृष्णराव परजणे पाटील, उपसरपंच विवेक परजणे यांच्यासह संवत्सर परिसरातील ग्रामस्थ, नातेवाईक उपस्थित होते. त्यांच्या निधनाने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.