आरोग्य
कोपरगाव ठरले कोरोनाचा राजधानी!
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात बाधित रुग्णांची संख्या ०३ हजार ६३९ इतकी आहे.तर सक्रिय रुग्णांची संख्या ३६४ असून आज पर्यंत ४९ जणांचे कोरोनाने निधन झाले आहे.त्यांचा मृत्यूचा दर हा १.३५ टक्के आहे.तर एकूण २२ हजार ६५९ जणांचे श्राव तपासणी करण्यात आली आहे.त्यांचा दर दहा लाखांचा दर हा ९० हजार ६९६ असा राहिला आहे.त्या तपासणीचा बाधित दर हा १६.०६ टक्के आहे.तर उपचारानंतर बरे होणारी संख्या हि ०३ हजार २२६ इतकी आहे. तर त्यांचा बरे होण्याचा दर ८८.६५ टक्के इतका असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी दिली आहे.गत वर्षीचा एक दिवसीय ६८ रुग्णवाढीचा विक्रम आजच्या आकडेवारीच्या मोडला असून या विक्रमी रुग्णवाढीमुळे आता कोपरगाव शहर व तालुक्यावर टाळेबंदीची तलवार टांगली आहे.
कोपरगाव शहर व तालुक्यात आज आलेल्या एकूण-५७ बाधित रुग्णांत पुढील रुग्णांचा समावेश आहे.
कोपरगाव शहरात आज आलेल्या एकूण-३१ बाधित रुग्णांत पुढील रुग्णांचा समावेश आहे.संजीवनी कारखाना पुरुष वय-१५,२५,सप्तर्षी मळामहिला वय-३५,लक्ष्मीनगर पुरुष वय-१४,खडकी पुरुष वय-४२,६०,मुले हॉस्पिटल पुरुष वय-३१,बैलबाजार रोड पुरुष वय-४२,अंबिका चौक महिला वय-४८,संभाजी चौक नगर पुरुष वय-२८,२७,महिला वय-४८,गिरमे चाळ पुरुष वय-३९,जोशीनगर महिला वय-६२,चंद्र लीला नगर -महिला वय-१५,१२,सागर पेट्रोल पंप पुरुष वय-३३,भारत प्रेस रोड पुरुष वय-२९,वडांगळे वस्ती पुरुष वय,६१,हनुमान नगर महिला वय-३०,२४,अंबिकानगर महिला वय-३४,गांधीनगर पुरुष वय-३६,४०,कोपरगाव पुरुष वय-२५,महिला वय-४२,४४,६५,इंदिरा पथ महिला वय-११,कोर्ट रोड पुरुष वय-५४,महादेव नगर पुरुष वय-४६,आदींचा समावेश आहे.
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर पुरुष वय-२१,महिला वय-६९,जेऊर पाटोदा पुरुष वय-४५,महिला वय-६५,३५,धोत्रे पुरुष वय-२१,कोळपेवाडी पुरुष वय-३३,४०,३८,महिला वय-५२,१६,सडे पुरुष वय-३४,कुंभारी पुरुष वय-६३,महिला वय-५८,मल्हारवाडी पुरुष वय-४५,महिला वय-१७,सुरेगाव पुरुष वय-४१,मुर्शतपुर पुरुष वय-३३,महिला वय-३२,येसगाव पुरुष वय ४७,महिला वय-४५,शिंगणापूर पुरुष वय-३३,३६,साखरवाडी वारी पुरुष-२४,डाऊच पुरुष वय-५७,घारी महिला वय-३७,आदींचा समावेश आहे.
दरम्यान कोरोना वाढीचा दर पुन्हा गतवर्षीप्रमाणे उच्चान्क गाठतो का असा संभ्रम तयार झाला होता तो दोन दिवसांपासून मोडीत निघाला आहे.आजपर्यंत कोरोना नीचांकी पातळीवर होता,मात्र आता या पुढील काळात सरकारने जाहीर केल्याप्रमाणे नागरिकांना लग्न,दहावे,अंत्यविधी आदी ठिकाणी गर्दीत जाण्याचे टाळावे लागणार आहे.या खेरीज बाहेर हॉटेल मध्ये जेवण गर्दीची ठिकाणी टाळावे लागणार असल्याचे आवाहन तहसीलदार योगेश चंद्रे यांनी केले आहे.सरकारने तसे आज नवीन नियम जाहीर केले आहे.