गुन्हे विषयक
भिंगरीवर चोरांची वक्र दृष्टी,३.७५ लाखांचा ऐवज लंपास,गुन्हा दाखल

जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील कर्मवीर सहकारी साखर कारखान्याची भिंगरीने विदर्भ,मराठवाडा आदी विभागासह राज्यातील अनेकांना वेड लावले आहे त्यातून या दारूचे काळ्याबाजारात मोठे मूल्य वाढलेले दिसत असून यातून अधून-मधून चोऱ्या होताना दिसत आहे.अशीच घटना नुकतीच कोपरगाव नजीक पुणतांबा चौफुलीवर घडली असून फिर्यादी महिला दमयंती विजय शिखरे यांच्या बंद दुकानांचे शटर तोडून त्यातून विविध खोक्यात असलेली ०३ लाख ७५ हजार ४१० रुपयांची भिंगरी दारू अज्ञात चोरट्याने लंपास केल्याने तालुक्यात खळबळ उडाली असून या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
कोपरगाव तालुक्यातील सहकारात अग्रणी असलेले साखर कारखाने आहे.त्यातच सन १९५६ साली उभारण्यात आलेल्या तत्कालीन कोपरगाव सहकारी साखर कारखान्याने साखरेबरोबरच आपले नाव “भिंगरी” (१९७७ साली नंदलाल लोखंडे यांच्या शिरोमणी चित्र निर्मित त्या वेळच्या गाजलेल्या मराठी चित्रपटावरून दिलेले नाव) नावाच्या दारू उत्पादनात कमावले आहे.त्यावर आता चोरांची वक्रदृष्टी पडली आहे.
कोपरगाव तालुक्यातील सहकारात अग्रणी असलेले साखर कारखाने आहे.त्यातच सन १९५६ साली उभारण्यात आलेल्या तत्कालीन कोपरगाव सहकारी साखर कारखान्याने साखरेबरोबरच आपले नाव “भिंगरी” (१९७७ साली नंदलाल लोखंडे यांच्या शिरोमणी चित्र निर्मित त्या वेळच्या गाजलेल्या मराठी चित्रपटावरून दिलेले नाव) नावाच्या दारू उत्पादनात कमावले आहे.विदर्भ,मराठावाड्यात,व अन्यत्रही या मद्याला मोठी मागणी असते.त्यामुळे या भिंगरीने नाव माहिती नाही असा माणूस विरळाच ! मात्र अलीकडील काळात या “भिंगरी”वर चोरांची नजर पडली असून त्यांनी आपला घसा असा ओला होत नाही म्हणून एक शक्कल लढवली असून थेट चोरीच्या माध्यमातून आपली (आंबट शौक) तहान भागविण्याचे ठरविलेले दिसत आहे.मागील महिन्यात असा एक ट्रकच चोरट्यांनी लंपास केला होता.आता हि एक महिन्यात दुसरी घटना उघडकिस आली असून कोपरगाव शहर पोलिसांचे या घटनेने धाबे दणाणले आहे.(कारण या उत्पादनात तसा राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचाच वाटा विक्रमी आहे व हीच मंडळी वर्तमानात सत्तेत असल्याने) त्यामुळे या दारुचोरांचा बंदोबस्त करण्याचे आव्हान पोलीस दलापुढे उभे ठाकले आहे.
दरम्यान कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात फिर्यादी महिला दमयंती शिखरे यांचे कोकमठाण हद्दीत पुणतांबा चौफुलीवर आपले दुकान थाटले आहे.शनिवार दि.१३ मार्च रोजी रात्री दहा वाजेनंतर तर आज सकाळी ९.३० वाजेच्या दरम्यान चोरट्याने नजीक कोणी नाही हि बाब हेरून शटर उचकटून आतील ०३ लाख ७५ हजार ४१० रुपयांचा देशी भिंगरी कॅम्पनीच्या १८० मी.ली.च्या १७३ खोके (त्याचे बॅच क्रं.२१२९ मार्च २०२१,२०१९,मार्च-२०२१,२०७६,२०५१,२०४१,प्रति खोके किंमत २ हजार १७०) लंपास केले आहे.या प्रकरणी फिर्यादी महिलेने गुन्हा दाखल केला आहे.
कोपरगाव शहर पोलिसानी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.८०/२०२१ भा.द.वि.कलम ३७९,४६१ प्रमाणे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भारत नागरे हे करीत आहेत.दरम्यान या घटनेने तालुक्यात उलतसुलट चर्चा सुरु आहे.