सण-उत्सव
आपली स्वाक्षरी हि मनाचा आरसा-तांदळे
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
“मराठी भाषेसाठी किमान आपली स्वाक्षरी मराठीत करावी,कारण ती आपल्या मनाचा आरसा असते,त्यामुळे आपल्या मातृभाषेची आपणास सतत आठवण राहील व तिच्या संवर्धन व विकासासाठी आपण प्रयत्न करण्याचा संकल्प मनात येत राहील व प्रत्येकाकडून त्यासाठी असे थोडे थोडे प्रयत्न झाले तर नंतर त्याला विशाल स्वरूप येऊन मराठी अधिक समृद्ध होईल” असे आवाहन सुप्रसिद्ध कवी व चित्रकार संतोष तांदळे यांनी व्यक्त नुकतेच कोपरगाव येथील एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले आहे.
जयंत नारळीकर,रघुनाथ माशेलकर,अनिल काकोडकर यांच्यासारखे महान शास्त्रज्ञ आजही मराठीत लेखन करतात.त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपणही आपल्याकडील ज्ञान भावना मातृभाषेत द्वारे आपल्या समाजापर्यंत पोहोचवाव्या”-उपप्राचार्य डॉ.एस.आर.पगारे.
कोपरगाव येथील कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीच्या के.जे.सोमैया महाविद्यालयात मराठी भाषा गौरव मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे त्यावेळी ते या दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.एस.आर.पगारे हे होते.
त्यावेळी पुढे बोलताना म्हणाले की,”कोणत्याही व्यक्तीच्या रक्तातच मातृभाषा ही असतेच,त्याच भाषेतून आपल्याला उत्तम पणे व्यक्त होता येते.त्यासाठीचे पेन व कागद हे साधन आपल्याकडे आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांना सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सतत व्यक्त होत राहिले पाहिजे.आजची पिढी फेसबुक, व्हाट्सअप,ट्विटर यांच्या जाळ्यात अडकली आहे.त्यातून बाहेर पडून सातत्याने प्रत्यक्ष पुस्तकाचे वाचन केले पाहिजे कारण महाविद्यालयीन काळात केलेले वाचन हे आपणास संस्कार संपन्न तर करतातच पण ती जीवनभर पुरेल अशी ती शिदोरी असते.
अध्यक्षीय समारोप करताना उपप्राचार्य डॉ.एस.आर.पगारे म्हणाले की,”आपण वाणिज्य शाखेचे प्राध्यापक असलो तरी येथे आल्यानंतर मला मराठी विभागातील प्राध्यापकांनी वाचनाची गोडी लावली व त्यामुळे आजपर्यंत आपण कितीतरी उत्तमोत्तम ग्रंथ वाचून आनंद प्राप्त केला आहे,तो ही घेण्यासाठी आपण सात्तत्याने वाचन करावे तसेच वाचना बरोबरच विद्यार्थ्यांनी स्वतंत्रपणे लेखनही केले पाहिजे.
कार्यक्रमाच्या आरंभी ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ या सुरेश भटांच्या कवितेवर कर्तृत्ववान मराठी माणसांच्या छायाचित्रासह चित्रफित दाखविण्यात आली व याप्रसंगी संतोष तांदळे यांना आपल्या ‘राजकारण’,’महापुरुष’,”नोकरी’ इ. विषयावर वास्तववादी व्यंग्यात्मक चारोळ्या सादर केल्या.त्याला विद्यार्थ्यांनीही मनसोक्त दाद दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ.गणेश देशमुख यांनी केले तर सूत्रसंचालन हिंदी विभाग प्रमुख डॉ.संजय दवंगे यांनी केले व शेवटी डॉ.जे. एस.मोरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मराठी विभागातील डॉक्टर विठ्ठल लंगोटे,विद्यार्थी निलेश,सेवक कानिफनाथ थोरात यांनी विशेष परिश्रम घेतले होते.