आरोग्य
बालकांमधील रक्तक्षय कमी करण्यासाठी जंतनाशक गोळी आवश्यक-सभापती
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील बालकांमधील रक्तक्षय कमी करण्यासाठी आपल्या बालकांना जंतनाशक गोळी या मोहिमेत द्यावी असे आवाहन सभापती पोर्णिमा जगधने यांनी टाकळी ब्राम्हणगाव येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
कृमीदोष बालकांना शारीरिकदृष्ट्या कमकुवत करतो.याचा थेट दुष्परिणाम बालकांच्या शारीरिक व वैयक्तिक विकासावर होतो.वैयक्तिक व आजूबाजूच्या परिसरातील अस्वच्छतेमुळे तसेच दूषित मातीच्या संपर्कात आल्यामुळे कृमीदोषांचा संसर्ग होत असल्याचे निदर्शनास आले आहे.कृमीदोष हे कुपोषण व रक्तक्षयाचे कारण असल्यामुळे कृमीदोष आढळणारी मुले ही नेहमी अशक्त व थकलेली असतात तसेच यामुळे बालकांची शारीरिक व बौद्धिक वाढही खुंटते त्यामुळे सरकारने हा उपक्रम सुरु केला आहे.
लहान मुलांचा शैक्षणिक विकास होण्याबरोबरच शारीरिक विकास होणेही महत्त्वाचे असते.त्यासाठी मैदानी खेळ महत्त्वाची भूमिका बजावतात. मैदानात खेळत असताना मुलांकडे नीट लक्ष न दिल्यास अनेक आजारांना निमंत्रण मिळते.त्यामध्ये कृमीदोष हा लहान वयात सहज होणारा व गंभीर आजार आहे. कृमीदोष बालकांना शारीरिकदृष्ट्या कमकुवत करतो.याचा थेट दुष्परिणाम बालकांच्या शारीरिक व वैयक्तिक विकासावर होतो.वैयक्तिक व आजूबाजूच्या परिसरातील अस्वच्छतेमुळे तसेच दूषित मातीच्या संपर्कात आल्यामुळे कृमीदोषांचा संसर्ग होत असल्याचे निदर्शनास आले आहे.कृमीदोष हे कुपोषण व रक्तक्षयाचे कारण असल्यामुळे कृमीदोष आढळणारी मुले ही नेहमी अशक्त व थकलेली असतात तसेच यामुळे बालकांची शारीरिक व बौद्धिक वाढही खुंटते. त्यामुळे त्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे कठीण जाते.बालकांमध्ये आढळणाऱ्या कृमीदोषाचे गांभीर्य लक्षात घेता तो समूळ नष्ट करण्यासाठी शासनाने विविध उपक्रम राबवले आहेत.त्याच अनुषंगाने आरोग्य विभागाकडून १० फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान राष्ट्रीय जंतनाशक सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. राष्ट्रीय जंतनाशक दिनाचा मूळ उद्देश १ ते ६ वयोगटातील सर्व मुले व ६ ते १९ वर्ष वयोगटातील शाळेत जाणाऱ्या व शाळेत न जाणाऱ्या सर्व मुला-मुलींना शाळा व अंगणवाडी केंद्र स्तरावर जंतनाशक गोळी देणे हा आहे. त्यामुळे त्यांचे आरोग्य चांगले होऊन पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावण्यास मदत होईल. या उपक्रमात दोन कोटी ७५ लाख ४८ हजार बालकांना जंतनाशक गोळी देण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे.कोपरगाव तालुक्यात या योजनेचा शुभारंभ कोपरगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र,टाकळी-ब्राम्हणगाव येथे कोपरगाव तालुक्यातील राष्ट्रीय जंतनाशक मोहीमेचे उद्घाटन आज कोपरगाव पंचायत समितीच्या सभापती पूर्णिमा जगधने यांच्या शुभ हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आले त्या वेळी त्या बोलत होत्या.
या प्रसंगी कोपरगाव पंचायत समिती सदस्य श्रावण आसने,राहुल जगधने उपस्थित होते.
बालकांमधील रक्तक्षय कमी करण्यासाठी आपल्या बालकांना जंतनाशक गोळी या मोहिमेत द्यावी असे आवाहन सभापती पोर्णिमा जगधने यांनी केले आहे.या मोहिमेत कोपरगाव तालुक्यातील १ वर्षे ते १९ वर्ष वयो गटातील ८९ हजार ३३१ बालकांना जंतनाशक गोळी देण्यात येणार अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष विधाते यांनी दिली आहे.
कोपरगाव तालुक्यात सर्व प्राथमिकआरोग्य केंद्र आणि उपकेंद्र येथे जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य यांचे हस्ते उद्घाटन झाले आहे. जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांनी संवत्सर येथे मोहीमेचे उद्घाटन केले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.