गुन्हे विषयक
कोपरगाव तालुक्यात अवैध वाळूचोरी,७.३० हजारांचा ऐवज जप्त

जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील गोदावरी नदी पात्रातील अवैध वाळू उचलण्यास नगर जिल्हाधिकाऱ्यांचा प्रतिबंध असताना हिंगणी ग्रामपंचायत हद्दीत डाऊच रस्ता येथे आज पहाटे १.१५ वाजता आरोपी अजीज शानूर भाई सय्यद (वय-४०) याने आपल्या ताब्यातील विनाक्रमांकाच्या डम्परने सुमारे तीन ब्रास वाळू उचलताना कोपरगाव तालुका पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने केलेल्या संयुक्त कारवाईने धाड टाकली असताना त्यातील तीन ब्रास वाळुसह डंपर असा ०७ लाख ३० हजारांचा ऐवज जप्त केला असून या प्रकरणी फिर्यादी पो.कॉ.रणजित पोपट जाधव यांनी गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.
उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठ व नगर जिल्हाधिकाऱ्यांनी नगर जिल्ह्यात अवैध वाळूस उपसा करण्यास प्रतिबंध केलेला आहे.तरीही या अवैध व्यवसायातून प्रचंड पैसा मिळत असल्याने या व्यवसायात अनेक सुशिक्षित तरुण अवैध व्यवसायात उत्तरले असून अनेकांनी कर्ज काढून डंपर,ट्रॅक्टर व तत्सम यांत्रिक साधने घेऊन यात स्वतःला झोकून दिले आहे.त्यामुळे यांना रोखण्याचे मोठे आव्हान पोलीस व महसूल विभागापुढे उभे टाकले आहे.
उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठ व नगर जिल्हाधिकाऱ्यांनी नगर जिल्ह्यात अवैध वाळूस उपसा करण्यास प्रतिबंध केलेला आहे.तरीही या अवैध व्यवसायातून प्रचंड पैसा मिळत असल्याने या व्यवसायात अनेक सुशिक्षित तरुण अवैध व्यवसायात उत्तरले असून अनेकांनी कर्ज काढून डंपर,ट्रॅक्टर व तत्सम यांत्रिक साधने घेऊन यात स्वतःला झोकून दिले आहे.त्यामुळे यांना रोखण्याचे मोठे आव्हान पोलीस व महसूल विभागापुढे उभे टाकले आहे.अशीच घटना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागास गुप्त खबऱ्यामार्फत मिळाली असता त्यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने मध्य रात्री १.१५ वाजेच्या सुमारास हिंगणी शिवारात डाऊच रस्त्यावर धाड टाकली असता त्यांना त्या ठिकाणी वरील विनाक्रमांकाचा डंपर तीन ब्रास वाळू वाहतूक करताना आढळून आला आहे.त्यांनी आरोपी अजीज सय्यद यास वाहनासह ताब्यात घेतला असून डंपर तीन ब्रास वालुसह जप्त केला आहे.
या प्रकरणी तालुका पोलिसानी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.६६/२०२१ भा.द.वि.कलम ३७९ सह पर्यावरण संरक्षण कायदा कलम ३,१५ प्रमाणे आरोपी अजीज सय्यद याचे विरुद्ध आज पहाटे चार वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल केला आहे.पपुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार एम.ए. कुसारे हे करीत आहेत.