गुन्हे विषयक
कोपरगाव बेट येथून दुचाकी चोरीस,गुन्हा दाखल
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरंगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कोपरगाव बेट येथील जनार्दन स्वामी मंदिराच्या परिसरात उभी करून ठेवलेली पंधरा हजार रुपये किमतीची लाल रंगाची होंडा पॅशन प्रो हि दुचाकी (क्रं.एम.एच.१७ ए. के.६२९५) हि नुकतीच अज्ञात आरोपीने चोरून नेली असल्याची फिर्याद संजय पाटीलबा खटाने (वय-५५) रा.सावखेड गंगा ता.वैजापूर यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.त्यामुळे दुचाकी चोरीचे सत्र पुन्हा सुरु झाल्याची भीती व्यक्त होत आहे.
कोपरगाव परिसरात दुचाकी चोरीच्या घटनात मधील काळात थोडा उतार आला असताना हि धक्कादायक घटना घडली आहे.विशेष म्हणजे हॅण्डलचे टाळा तोडून हि दुचाकी चोरट्यानी लांबवली आहे.व स्वतःच्या फायद्यासाठी लाबाडीच्या इराद्याने ती चोरून नेली आहे.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.कोपरगाव शहर पोलिसानी या प्रकरणी गुन्हा क्रं.५७/२०२१ भा.द.वि.कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपस पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना.दारकुंडे हे करित आहेत.या प्रकरणी पोलिसानी तातडीने चौकशी करून दुचाकी चोरांना आळा घालावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.