गुन्हे विषयक
रांजणगाव देशमुख मधील “त्या”खुनाला वर्षाने फुटली वाचा !
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथील महावितरण च्या सबस्टेशन नजीक शेतात दि.२६ जानेवारी २०२० शेतात हरभरा पिकास पाणी भरत असताना अज्ञात आरोपीने डोक्यात वार करून खून केलेल्या संजय भाऊसाहेब खालकर (वय-२९) याच्या कुणाला तब्बल एक वर्षांने वाचा फुटली असून या प्रकरणातील साक्षिदार ज्ञानदेव भाऊसाहेब खालकर हाच या प्रकरणातील आरोपी आढळला असून त्याचा बनाव उघडा पडला आहे.व त्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच अटक केली असून त्यास कोपरगाव येथील अतिरिक्त मुख्य दंडाधिकारी श्री डोईफोडे यांनी चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.त्यामुळे रांजणगाव देशमुख परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसानी या प्रकरणी सखोल तपास केला असता मयत व आरोपी यांचा जमीन वाटपावरून वाद असल्याचे निष्पन्न झाले होते.व गट.क्रं.११२ मध्ये त्यांचे ०१.८० हे.असे सामायिक वाटप होऊन त्यातील एक सामायिक ०.३० आर क्षेत्र सामायिक ठेवण्यावरून वाद होता.व त्यांचा २०१३ पासून मयत संजय खालकर,सुनील तुळशीराम खालकर,बाबासाहेब तुळशीराम खालकर यांच्यात चिंचोली रोड वरील जमिनीचा वाद होऊन त्यावरून अनेकवेळा मयतास व त्याचे भावास आरोपी ज्ञानदेव खालकर याने मारहाण केलेली होती त्यावरून पुढील तपास सुकर झाला आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख शिवारात दि.२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास गट क्रं.११२ मध्ये रांजणगाव देशमुख येथे शेतात पाणी भरत असताना तरुण संजय बाळासाहेब खालकर या शेतकऱ्याचा डोक्यात घाव घालून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना कोपरगाव-संगमनेर रस्त्यालगत घडल्याने रांजणगाव देशमुख परिसरात खळबळ उडाली होती.मयत संजय बाळासाहेब खालकर शेतकरी रात्रीचा विद्युतपुरवठा असल्याने शेतातील हरभरा व कांद्याला पाणी देण्यसाठी रात्री वस्तीवरून गावाकडील कोपरगाव-संगमनेर रस्त्याला रांजणगाव देशमुख विद्युत उपकेंद्राच्या पूर्वेला असलेल्या शेतात आले होते.शेतात पाणी चालू असताना साडेअकरा ते पावणेबारा वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने त्यांच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराने घाव घालून त्यांचा खून केला होता.जवळच त्यांचे चुलतभाऊ ज्ञानदेव भाऊसाहेब खालकर पाणी भरत होता.त्यांनी पाणी भरत असताना रस्त्याकडे बॅटरी लावून पाहिले तर तिघे जण तोंड बांधून उभे दिसले व रस्त्याला पांढऱ्या रंगाची मोटार उभी दिसली.बॅटरी लावल्यामुळे ते त्यांच्या दिशेने धावले,ज्ञानदेव खालकर यांना चुलत भाऊ संजय खालकर हे खाली पडलेले दिसले असा बनाव केला होता. ही घटना त्यांनी घरी जाऊन चुलतभाऊ व इतरांना सांगुन शिर्डी पोलिसांना कल्पना दिली होती.संजय खालकर यांना तातडीने शिर्डी येथे साईबाबा रुग्णालयात नेले मात्र त्या अगोदरच त्यांचा मृत्यू झाला होता.घटनेची माहिती कळताच शिर्डीचे पोलीस घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी आपला तपास सुरु केला होता मात्र वर्षाचा कालखंड होऊनही त्या खुनाला वाचा फुटत नव्हती.त्यामुळे या घटनेत पोलिसही चक्रावून गेले होते.अखेर हे प्रकरण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे नुकतेच सोपवले होते.सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.के.देशमुख यांनी या प्रकरणी संशयित आरोपी व घटनेचा साक्षिदार ज्ञानदेव खालकर याला दि.८ फेब्रुवारी रोजी अटक केली होती.पोलिसानी या प्रकरणी सखोल तपास केला असता मयत व आरोपी यांचा जमीन वाटपावरून वाद असल्याचे निष्पन्न झाले होते.व गट.क्रं.११२ मध्ये त्यांचे ०१.८० हे.असे सामायिक वाटप होऊन त्यातील एक सामायिक ०.३० आर क्षेत्र सामायिक ठेवण्यावरून वाद होता.व त्यांचा २०१३ पासून मयत संजय खालकर,सुनील तुळशीराम खालकर,बाबासाहेब तुळशीराम खालकर यांच्यात चिंचोली रोड वरील जमिनीचा वाद होऊन त्यावरून अनेकवेळा मयतास व त्याचे भावास आरोपी ज्ञानदेव खालकर याने मारहाण केलेली होती.व अलीकडील काळात प्रतिवादी असलेल्या अशोक रामभाऊ खालकर यांचेशी संबंध ठेऊ लागला होता.व त्याच्या बाजूने जाऊन त्याला न्यायालयीन कामकाजात मदत करायला लागला होता.मयत संजय खालकर व आरोपी ज्ञानदेव खालकर यांच्यात किरकोळ कारणावरून वारंवार भांडणे झाली होती.घटनेच्या दिवशी याच क्षेत्रातील मुरूम भरण्यावरून आरोपी ज्ञानदेव खालकर याने मयतास मुरूम भरण्यावरून आपल्या दूरध्वनीवरून साक्षीदार संदीप खालकर याच्या मार्फत धमकी दिली देताना. “मयताच्या बापाची जमीन आहे का ? त्याला दाखवतो” असे बोलला होता.व त्याच दिवशी रात्री हि घटना घडली होती.त्यामुळे पोलीसांनीं या प्रकरणी मोबाईल सी.डी.आर.तपासले असता घटनास्थळी मयत,साक्षिदार व आरोपी हे एका ठिकाणी आल्याचे आढळून आले असल्याने त्याला दुजोरा मिळाला आहे.शिवाय मयताचा झालेला मृत्यू बाबतचा वैद्यकीय अधिकाऱ्यांचा अहवाल त्या घटनेला दुजोरा मिळाला आहे.व एकाच हत्याराने व मयत स्थिर असताना हा खून झाला असल्याचे निष्पन्न झाले होते.या घटनेतील फावडे अद्याप जप्त करावयाचे असल्याने त्यास न्यायालयापुढे आरोपीविरुद्ध सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती.दोन्ही बाजूचा युक्तिवाद एकूण अतिरिक्त मुख्य न्यायमूर्ती श्री डोईफोडे यांनी आरोपीस चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.दरम्यान सरकारी पक्षाच्या वतीने अड्.सोमनाथ व्यवहारे यांनी काम पाहिले तर आरोपीच्या वतीने अड्.ख्रिस्ते यांनी काम पाहिले आहे.नगर येथील स्थनिक गुन्हे शाखेच्या पोलिस अधिकाऱ्यानी हा तपास लावल्याने त्यांचे कौतुक होत आहे.