जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
बाजार भाव

कोपरगावात कांदा बाजारास उतार

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

गेल्या सप्ताहपासून लाल कांदा बाजारभाव वाढत असताना कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी मात्र सरासरी ४०० रुपयांनी घसरण झाली असून ते कमाल ३ हजार ६०० रुपयांवरून ३ हजार १०० रुपयांवर आहे. देशांतर्गत बाजारपेठेत मागणीच्या तुलनेत कांदा आवक वाढल्याने बाजारभावात घसरण झाल्याची माहिती बाजार समितीने दिली आहे.

बुधवारच्या तुलनेत गुरुवारी कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल कांदा किमान,कमाल व सरासरी बाजारभावात घसरण झाली.बुधवारी लाल कांद्यास प्रतिक्विंटल किमान ११०० ते कमाल ३६२५ (सरासरी ३२५०) रुपये बाजारभाव मिळाला होता. त्यामुळे गुरुवारच्या बाजार भावाकडे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या होत्या. गुरुवारी कोपरगावात एक क्रमांकाच्या कांद्यास कमाल ३ हजार ६०० ते किमान ३ हजार १०० तर दुय्यम प्रतिस कमाल ३ हजार ते किमान ११०० रुपये असा बाजारभाव मिळाला. तर कनिष्ठ प्रतीच्या कांद्यास कमाल १ हजार ५०० ते ५०० असा दर मिळला असल्याची माहिती कोपरगाव बाजार समितीचे प्रशासक एन.जी.ठोंबळ यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे. बुधवारच्या तुलनेत गुरुवारी लाल कांदयाचे बाजारभाव किमान १०० रुपयांनी,कमाल २७४ रुपयांनी, तर सरासरी ४०० रुपयांनी खाली आले असल्याची माहिती हाती आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close