नगर जिल्हा
आत्मा मालिकला राज्यस्तरीय ‘विज्ञान उपक्रमशील विद्यालय पुरस्कार’
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगांव ( प्रतिनिधी )
अहमदनगर येथील जनसेवा सामाजिक, शैक्षणिक प्रतिष्ठाण या संस्थेच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय ‘विज्ञान उपक्रमशील विद्यालय पुरस्कार’ आत्मा मालिक शैक्षणिक क्रीडा संकुलाच्या आत्मा मालिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुल, कोकमठाण या विद्यालयास देण्यात आला आहे.जनसेवा सामाजिक, शैक्षणिक प्रतिष्ठाण आयोजित डॉ. सी.व्ही रमण बालवैज्ञानीक परीक्षा व कार्यशाळेमध्ये राज्यस्तरावर सर्वाधिक विद्यार्थी यादीमध्ये येणा-या विद्यालयास हा पुरस्कार देवून गौरविण्यात येते. यामध्ये आत्मा मालिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुलाचे १२२ विद्याथ्र्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवीले आहे.
गुणवत्ता यादीत आलेल्या विद्याथ्र्यांचा पारितोषिक वितरण सोहळा डॉ. नानासाहेब पवार सभागृह महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी पार पडला. या कार्यक्रमात डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक प्रा. श्रीनिवास औंधकर, श्रीहरीकोटा येथील इस्त्राचे शास्त्रज्ञ प्रतिक पाटील, सी.ए.पी.एफ चे असिस्टंट कमान्डं संचीत जाधव, विभागीय कृशी उपसंचालक शिरीश जाधव, दत्तात्रय आरोटे, शांताराम डोंगरे यांचे हस्ते विद्यालयास राज्यस्तरीय विज्ञान उपक्रमषील विद्यालय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
या विद्यार्थ्याना प्राचार्य निरंजन डांगे, विभाग प्रमुख रमेश कालेकर, मिना नरवडे, सागर अहिरे, सचिन डांगे, पर्यवेक्षक अनिल सोनवणे, बाळासाहेब कराळे, रविंद्र देठे, विज्ञान अध्यापक नयना शेटे, सोपान शेळके, अमोल कर्डीले, राजश्री पिंगळे, भारती बोळीज, आशा देठे, अश्विनी होन, मिना बेलोटे, संदिप शिंदे, प्रशांत खलाटे, यांचे मार्गदर्शन लाभले.
या विद्यार्थ्यांचे आत्मा मालिक माऊली, आत्मा ध्यानयोग मिषनचे अध्यक्ष संत परमानंद महाराज, ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन, विश्वस्त वसंतराव आव्हाड, प्रभाकर जमधडे, प्रकाश भट, बाळासाहेब गोर्डे, प्रकाश गिरमे, माधवराव देशमुख, व्यवस्थापक हिरामण कोल्हे यांनी अभिनंदन केले आहे.