कोपरगाव तालुका
स्वप्न पूर्ण करण्यासाठी मनापासून प्रयत्न करा- प्रा.शिंदे
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)आपण कुठल्या परिस्थितीत व जातीधर्मात जन्माला आलो हे महत्वाचे नसून आपले कर्तृत्व कसे उभे करायचे हे आपल्या हातात आहे.आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत शिकण्याची जिद्द ठेवून मोठी स्वप्नं पहा आणि ती स्वप्नं पूर्ण करण्यासाठी मनापासून प्रयत्न करा असे आवाहन समाजप्रबोधनकार प्रा.गणेश शिंदे यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
आपण कुठल्या परिस्थितीत व जातीधर्मात जन्माला आलो हे महत्वाचे नसून आपले कर्तृत्व कसे उभे करायचे हे आपल्या हातात आहे.आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत शिकण्याची जिद्द ठेवून मोठी स्वप्नं पहा आणि ती स्वप्नं पूर्ण करण्यासाठी मनापासून प्रयत्न करा असे आवाहन समाजप्रबोधनकार प्रा.गणेश शिंदे यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
आपल्या वाड-वडिलांनी आपल्यावर केलेले संस्कार व समाजकारणाचा वारसा पुढे चालविण्यासाठी व आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी व्हावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आ.काळे जबाबदारी अत्यंत चांगल्या पद्धतीने सांभाळत असून त्यांचा आदर्श घेऊन उच्चशिक्षित तरुणांनी राजकारणात आलं पाहिजे.- समाजप्रबोधनकार प्रा.गणेश शिंदे
आपण कुठल्या परिस्थितीत व जातीधर्मात जन्माला आलो हे महत्वाचे नसून आपले कर्तृत्व कसे उभे करायचे हे आपल्या हातात आहे.आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत शिकण्याची जिद्द ठेवून मोठी स्वप्नं पहा आणि ती स्वप्नं पूर्ण करण्यासाठी मनापासून प्रयत्न करा असे आवाहन समाजप्रबोधनकार प्रा.गणेश शिंदे यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव-कोळपेवाडी येथे राधाबाई काळे कन्या विद्या मंदिरात सुशीलामाई काळे यांच्या पुण्यस्मरणार्थ आयोजित ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेच्या बक्षीस वितरणप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे होते.
यावेळी पंचायत समिती सभापती पौर्णिमा जगधने,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,एस.एस.जी.एम. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकरराव थोपटे,संभाजी काळे,सुरेगावचे सरपंच शशिकांत वाबळे,संत जनार्दन स्वामी हॉस्पिटलचे संचालक प्रसाद कातकडे,पोलीस पाटील संजय वाबळे,राहुल चांदगुडे, भाऊसाहेब लुटे,राहुल जगधने,बाळासाहेब ढोमसे,श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य रामकृष्ण दिघे,राधाबाई काळे कन्या विद्यामंदिरच्या प्राचार्या छाया काकडे,श्री छत्रपती संभाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र पाचोरे,प्रवीण नीळकंठ आदी मान्यवरांसह शिक्षक,विद्यार्थी – विद्यार्थिनी व पालक उपस्थित होते.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की,”कर्मवीर शंकरराव काळे यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून केलेले शिक्षण प्रसाराचे काम,सहकार क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानामुळे ते आजही समाजाच्या स्मरणात आहे. समाजासाठी काय करावं हे काळे यांचेकडून शिकावे.निव्वळ गुणपत्रिकेवर आलेली गुणांची सूज म्हणजे गुणवत्ता नव्हे, सामाजिक कार्य करणे म्हणजे गुणवत्ता असून या गुणवत्तेची गरज आहे. आपलं ज्ञान समाजच्या कल्याणासाठी उपयोगात आणले जात नाही तोपर्यंत जगण्याची मजा नाही.प्रत्येकामध्ये वेगळेपणा आहे हे वेगळेपण आपल्याला शोधता आले पाहिजे.पालकांनी आपल्या पाल्यांना भेटवस्तू म्हणून पुस्तके दिली पाहिजे. मुलांना अभ्यासक्रमाच्या पलीकडील शिक्षण देण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे. माईंच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन लक्षवेधी उपक्रम असून या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी वाचतील, बोलतील,व्यक्त होतील व आपल्या भावना इतरांसमोर मांडतील हीच त्यांच्या स्मृतींना खरीखुरी आदरांजली ठरणार असल्याचे प्रा.गणेश शिंदे यांनी यावेळी सांगितले.