कोपरगाव तालुका
सुकर्म प्रतिष्ठानच्या वतीने विद्यार्थ्यांना गणवेश वाटप
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी)
कोपरगाव येथील सुकर्म प्रतिष्ठान यांचे वतीने माजी आमदार अशोक काळे यांच्या वाढदिवसानिमित कोपरगाव येथील के. बी. पी. विद्यालयाच्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात नुकताच संपन्न झाला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष पद्माकांत कुदळे हे होते.
माजी आ. अशोक काळे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी नुकताच साजरा करण्यात आला.सुकर्म प्रतिष्ठानने या बाबत नवीन उपक्रम साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुकर्म प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर म्हस्के यांनी केले. यावेळी महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्टचे मानद सचिव धरमशेठ बागरेचा यांनी गुरुकुल प्रकल्पाच्या पाच विद्यार्थ्यांचे प्रत्येकी दीड हजार व साडेसात हजार रुपये रोख स्वरुपात विद्यालयाचे मुख्याध्यापक विश्वासराव काकळीज यांच्याकडे सुपूर्द केले.
सदर प्रसंगी विजय आढाव, संदीप वर्पे, सुनील गंगूले, सुनील शिलेदार,सुनील बोरा, फकीरमामु कुरेशी, विजय वडांगळे,नवाज कुरेशी, सतिष शिंदे, संतोष आहेर, बाळासाहेब रुईकर, निलेश डांगे, अशोक आव्हाटे, राजेंद्र जोशी, राजेंद्र आभाळे, फकीरमामू कुरेशी, राजेंद्र खैरनार, मुकुंद इंगळे, निखील डांगे, शफिक शेख, चांदभाई पठाण, तेजस साबळे, हृषीकेश खैरणार, आदर्श पठारे, आकाश विदुर आदी मान्यवरांसह सुकर्म प्रतिष्ठाणचे पदाधिकारी व कार्यकर्ते, प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.