जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवडणूक

कोपरगावात ग्रामपंचायत निवडणूक तयारी पूर्ण

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

राज्यातील १४ हजार २३४ ग्रामपंचायती सोबतच कोपरगाव तालुक्यातील २९ ग्रामपंचायतीची तयारी निवडणूक शाखेकडून पूर्ण झाली असून या निवडणूकीत एकुण ११२ मतदान केंद्र असून २७२ जागेसाठी ६११ उमेदवार रिंगणात आहेत.६३७८५ मतदार पुरुष ३२८९६ स्रीया ३०८८९ मतदार आपला अधिकार बजावणार असल्याची माहिती निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार योगेश चंद्रे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

कोपरगाव तालुक्यातील २९ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतदान केंद्रस्तरावर प्रत्यक्ष कामकाज पहाणारे केंद्राध्यक्ष,मतदान अधिकारी,शिपाई,पोलिस कर्मचारी यांचा अंतिम समुह गठीत करुन मतदान यंत्र,नियंत्रण यंत्रासह मतदान केंद्रावर पोहचत असतांना आज रात्री टाकळी ग्रामपंचायत हद्दीत एका लोकप्रतिनिधीने आचार संहितेचे उल्लंघन करत प्रभाग क्रमांक तीन मध्ये एका बैठकीचे आयोजन केल्याची खात्रीलायक माहिती उपलब्ध झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

कोपरगाव तालुक्यातील २९ ग्रामपंचायत निवडणुकीत केंद्रस्तरावर कामकाज पहाणारे अधिकारी आणि कर्मचारी यांना मुखपट्या व प्रतिबंधक औषधे आदी साहित्य निवडणूक शाखेकडून उपलब्ध करून देण्यात आले आहे.तसेच आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.मात्र अधीकारी,कर्मचारी,व किती वहाने उपलब्ध करून दिली आहेत याची माहिती दिली नाही.

निवडणुक निरीक्षक तथा उपविभागीय अधिकारी डॉ.अर्चना पठारे यांनी मतदान प्रक्रियेचा आढावा घेतला आहे.राज्य निवडणूक प्राधिकृत अधिकारी तथा तहसिलदार योगेश चंद्रे,उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव,पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी,दौलतराव जाधव,प्रविण लोखंडे यांचे सह निवडणूक निर्णय अधिकारी,क्षेत्रीय अधिकारी निवडणूक प्रक्रिया सुलभतेने होणे कामी विशेष लक्ष ठेवून असणार आहे.

कोपरगाव तालुक्यातील २९ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतदान केंद्रस्तरावर प्रत्यक्ष कामकाज पहाणारे केंद्राध्यक्ष,मतदान अधिकारी,शिपाई,पोलिस कर्मचारी यांचा अंतिम समुह गठीत करुन मतदान यंत्र,नियंत्रण यंत्रासह मतदान केंद्रावर आवश्यक त्या साहित्याचे वितरण करुन मतदान केंद्रावर कामकाज पहाणारे समुह रवाना करण्यात आले.तसेच टपाल मतदान प्रक्रिया पुर्ण करण्यात आली.शुक्रवार १५ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ७:३० ते दुपारी ५:३० पर्यत मतदान असणार आहे.

निवडणूक प्रक्रिया यशस्वीतेसाठी निवडणूक नायब तहसिलदार प्रशांत गोसावी,माधवी गोरे मनिषा कुलकर्णी,अरुण रणनवरे, यांचे सह विविध खातेनिहाय अधिकारी,कर्मचारी परिश्रम घेत आहे.मतदारांनी मतदानाला जातांना तोंडावर मुखपट्टी लावून कोरोना प्रतिबंधात्मक व्यक्तीगत काळजी घेवून मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा.असे आवाहन राज्य निवडणूक आयोग नियुक्त प्राधिकृत अधिकारी तथा तहसिलदार योगेश चंद्रे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close