कोपरगाव तालुका
पतंग उत्सवात नायलॉन धागा वापरण्यास बंदी-पोलीस निरीक्षक
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरात संक्रात सणासाठी पतंग बाजी करण्यास नायलॉन धागा बाळगण्यास बंदी असून साधा पारंपारिक वापरण्याचे आवाहन कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
“पतंगबाजीसाठी नायलॉन अथवा तंगुस धागा वापरणारे किंवा बाळगणारे यांच्यावर यापुढे कारवाई होणार असून लहान मुलांकडे नायलॉन अथवा तंगुस धागा आढळून आल्यास त्यांच्या पालकांवर कारवाई होणार आहे.कोपरगाव शहरातील ज्या इमारतींवर नायलॉन धागा आसारी आढळून येईल.त्या इमारत मालकांवर कारवाई होणार आहे”-हर्षवर्धन गवळी,पोलीस निरीक्षक,कोपरगाव शहर.
संक्रात सण जसा-जसा जवळ येऊ लागतो तसे तरुणांना पतंगाचे वेध लागतात.संक्रांतीला अद्याप दहा दिवसांचा अवकाश आहे.मात्र काही अतिउत्साही तरुण आत्ताच पतंगबाजी करून अनेकांना अडचणी निर्माण करत असल्याचे सार्वत्रिक चित्र दिसू लागले आहे.कोपरगाव शहरात अनेकांना पतंगामुळे आपला जीव गमवावा लागल्याची पुष्कळ उदाहरणे घडली आहे.विशेषतः पतंगासाठी वापरण्यात येणारा प्लास्टिकचा चिनी मांजा हा अनेकांसाठी जीवघेणा ठरत आहे.संक्रात जशी-जशी जवळ येत चालते तशी-तशी पातळ ताव व बांबूच्या कामट्या वापरुन पतंग बनविणाऱ्या कारागिरांची घाई उडताना दिसून येते.त्यावर शासनाने प्रतिबंध केला आहे.असे असतानाही काही तरुण व उत्साही मंडळी नायलॉनच्या मांज्याचा वापर करताना दिसून येत आहे.या पार्श्वभूमीवर हे प्रसिद्धीपत्रक प्रसिद्धीस दिल्याने त्याचे महत्व वाढले आहे.
त्यांनी पल्या प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हटले आहे की,”पतंगबाजीसाठी नायलॉन अथवा तंगुस धागा वापरणारे किंवा बाळगणारे यांच्यावर यापुढे कारवाई होणार असून लहान मुलांकडे नायलॉन अथवा तंगुस धागा आढळून आल्यास त्यांच्या पालकांवर कारवाई होणार आहे.कोपरगाव शहरातील ज्या इमारतींवर नायलॉन धागा आसारी आढळून येईल.त्या इमारत मालकांवर कारवाई होणार आहे.तसेच नायलॉन अथवा तंगुस धागा वापरणाऱ्या किंवा त्याचा साठा करणाऱ्या व्यक्तींची माहिती कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला द्यावी संबंधित इसमाचे नाव गोपनीय ठेवून त्याला योग्य ते बक्षीसही दिले जाणार आहे.न्यायालयाचे निर्देश पालन करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे.असे आवाहन करुन कोपरगाव शहरातील नागरिकांना कोपरगाव शहर पोलिस स्टेशनचे वतीने मकर संक्रांती उत्सवाच्या शुभेच्छा पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी शेवटी दिल्या आहेत.