गुन्हे विषयक
कोपरगावात एकाची लूट,गुन्हा दाखल
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरात गंगापूर तालुक्यातील देरडा येथील रहिवाशी व बुधवार फिर्यादी इसम दीपक कचरू औताडे (वय-३६) यांना दि.३० डिसेंबरच्या रात्री ११.३० वाजेच्या सुमारास संजयनगर भाजीमार्केट रोडवर अज्ञात चार ते पाच चोरट्यांनी शस्राचा धाक दाखवून त्यांच्याकडील ओपो कंपनीचा मोबाईल त्यातील सिमकार्ड,व त्यातील दोनशे रुपयांची रोकड आदीं १० हजार २०० रुपयांची लूटमार करून चोरट्यांनी धूम ठोकली असल्याची फिर्याद कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
कोपरगावचे उपनगर असलेल्या संजयनगर या परिसरात भाजीपाला मार्केट रोडवर रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास गंगापूर तालुक्यातील देरडा येथील रहिवाशी असलेले इसम दीपक औताडे हे प्रवास करत असताना या परिसरात चार ते पाच आरोपींनी त्याना अडवून त्यानां शस्राचा धाक दाखवून,शिवीगाळ करून व जीवे मारण्याची धमकी देऊन लाथा बुक्य्यांनी मारहाण त्यांच्याकडील ऐवज लंपास केला आहे.
कोपरगाव शहरात वर्तमानात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यापासून लुटमारीच्या घटनांत लक्षणीय वाढ झाली असून या घटनात वारंवारिता वाढली आहे.त्यामुळे नागरिकांत याबाबत भीतीचे वातावरण पसरले आहे.अशीच घटना कोपरगावचे उपनगर असलेल्या संजयनगर या परिसरात भाजीपाला मार्केट रोडवर रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास गंगापूर तालुक्यातील देरडा येथील रहिवाशी असलेले इसम दीपक औताडे हे प्रवास करत असताना या परिसरात चार ते पाच आरोपींनी त्याना अडवून त्यानां शस्राचा धाक दाखवून,शिवीगाळ करून व जीवे मारण्याची धमकी देऊन लाथा बुक्य्यांनी मारहाण करून त्यांच्या ताब्यातील ओपो कंपनीचा मोबाईल त्यातील सिमकार्ड व रोख दोनचे रुपयांची रक्कम चोरट्यांनी लांबवली आहे.त्यांनी याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.८६०/२०२० भा.द.वि.कलम ३९७,५०४,५०६,३४ प्रमाणे अज्ञात चार ते पाच आरोपीं विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाययक पोलीस निरीक्षक दीपक बोरसे हे करीत आहेत.