गुन्हे विषयक
बांधावरून कुऱ्हाड,कोयत्याने मारहाण,दोन जखमी
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील मायगाव देवी ग्रामपंचायत हद्दीत सामायिक बांधाचे कारणावरून आरोपी राकेश रामचंद्र खांडगौरे,अंकुश रामचंद्र खांडगौरे,रामचंद्र रंगनाथ खांडगौरे,सर्व रा,मायगाव देवी यांनी फिर्यादी गणेश शशिकांत कासार,व त्यांचा चुलत भाऊ ललित सिताकांत खांडगौरे (कासार) (वय-२४) यांना कोयता,कुऱ्हाड,काठी आदींनी मारहाण करून त्यांना गंभीर दुखापत केली असल्याची फिर्याद कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने मायगाव देवी परिसरात खळबळ उडाली आहे.
फिर्यादी हे आपल्या शेतात रविवार दि.०६ नोव्हेम्बर रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास गट क्रं.१८५ मध्ये फेरफटका मारण्यासाठी गेले असता आरोपी हे त्यांच्या बांधाला लगत शेतजमीन नांगरत असताना त्यांना फिर्यादी गणेश कासार यांनी बांदाला लागून नांगरट करू नको अशी विनंती केली असता कोयता,कुऱ्हाड व काठीने हा हल्ला झाला आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी गणेश कासार व आरोपी राकेश खांडगौरे यांची मायगाव देवी हद्दीत शेजारी-शेजारी जमीन आहे.वर्तमानात रब्बी पिकांची उभारणी सुरु असून फिर्यादी हे आपल्या शेतात रविवार दि.०६ नोव्हेम्बर रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास गट क्रं.१८५ मध्ये फेरफटका मारण्यासाठी गेले असता आरोपी हे त्यांच्या बांधाला लगत शेतजमीन नांगरत असताना त्यांना फिर्यादी गणेश कासार यांनी बांदाला लागून नांगरट करू नको अशी विनंती केली असता त्याचा आरोपी राकेश रामचंद्र खांडगौरे,अंकुश रामचंद्र खांडगौरे, रामचंद्र रंगनाथ खांडगौरे यांना राग आला व त्यांनी आपल्या हातातील कुऱ्हाड,लोखंडी कोयता,लाकडी काठी यांनी फिर्यादी गणेश कासार व त्यांचा चुलत भाऊ ललित खांडगौरे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली त्यात फिर्यादी व त्यांचा भाऊ ललित खांडगौरे यांना डोक्यात,हातावर,पाठीवर,मारहाण करून गंभीर जखमी केले आहे.त्यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देवून लाथा बुक्यांनी मारहाण केली आहे.याबाबत फिर्यादी गणेश कासार यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात आरोपीं विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीसांनी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.५४९/२०२० कलम ३२६,३२४,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे आरोपी आरोपी राकेश रामचंद्र खांडगौरे,अंकुश रामचंद्र खांडगौरे,रामचंद्र रंगनाथ खांडगौरे यांचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.चंद्रकांत तोर्वेकर हे करीत आहेत.या घटनेत फिर्यादी गणेश कासार व त्यांचा चुलत भाऊ ललित खांडगौरे हे जखमी झाला असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.