जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

शिरसगावात दिपावली पाडव्याला भुसार मालाचे लिलाव होणार सुरु

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी )

कोपरगाव तालुक्याच्या पूर्वेस शेतकऱ्यांच्या दळणवळणासाठी सोयीस्कर ठरणाऱ्या शिरसगाव-तीळवणी ग्रामपंचायत हद्दीत कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने कांदा बाजारा नंतर आता भुसार मालावर आपले लक्ष केंद्रित केले असून दिपावली पाडव्याच्या मुहूर्तावर सोमवार दि.28 ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता भुसार शेतीमालाचा लिलाव करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती बाजार समितीचे सभापती संभाजी रक्ताटे यांनी जनशक्ती न्यूजला दिली आहे.

उत्तमराव औताडे बाजार समितीचे सभापती असताना या कामांना वेग आला होता त्याच बाजार समितीतील काही संचालकांनी वरिष्ठ नेत्यांकडे कागाळ्या करण्यात समाधान मानले.व अनेक विकास प्रकल्प बंद पाडले होते.त्यांनी वेळ तीन ठिकाणी उपबाजार प्रस्तावित केले होते.त्यांच्या नंतर कोणीही त्यासाठी प्रयत्न केला नाही.आता उशिराने का होईना बाजार समितीस शहाणपण सुचले आहे हे हि नसे थोडके.मात्र जवळके व चासनळी या ठिकाणी बाजार समितीस उत्पन्न वाढण्याची जागा असतानाही या ठिकाणी उपबाजार का चालू होत नाही हा प्रश्न मात्र तसाच बाकी आहे.

कोपरगाव तालुक्यात उपबाजार सुरु करण्यास चासनळी,जवळके, शिरसगाव आदी ठिकाणी मोठी संधी असतानाही बाजार समितीने आजपर्यंत केवळ बघ्याची भूमिका घेतली होती.या बाबत या भागातील शेतकऱ्यांनी वारंवार मागणी करूनही उपयोग होत नव्हता.तुलनेने राहाता बाजार समिती उशिराने स्थापन होऊनही त्यांनी कोपरगाव बाजार समिती साई संस्थानची खरेदी बंद करूनही स्थानिक सत्ताधाऱ्यांनी त्याकडे सोयीस्कर कानाडोळा केला होता.मात्र त्याकडे ना सत्ताधाऱ्यांनी आवाज उठवला ना विरोधकांनी.त्यामुळे आधीच ओस पडलेली बाजारपेठ आणखी ओस पडली होती.उत्तमराव औताडे बाजार समितीचे सभापती असताना या कामांना वेग आला होता त्याच बाजार समितीतील काही संचालकांनी वरिष्ठ नेत्यांकडे कागाळ्या करण्यात समाधान मानले.व अनेक विकास प्रकल्प बंद पाडले होते.त्यांनी वेळ तीन ठिकाणी उपबाजार प्रस्तावित केले होते.त्यांच्या नंतर कोणीही त्यासाठी प्रयत्न केला नाही.आता उशिराने का होईना बाजार समितीस शहाणपण सुचले आहे हे हि नसे थोडके.मात्र जवळके व चासनळी या ठिकाणी बाजार समितीस उत्पन्न वाढण्याची जागा असतानाही या ठिकाणी उपबाजार का चालू होत नाही हा प्रश्न मात्र तसाच बाकी आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close