गुन्हे विषयक
स्वच्छता गृहांच्या कामावरून मारहाण,सहा जणांवर गुन्हा दाखल
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
“न्यायालयात खटला चालू आहे,निकाल लागेपर्यंत स्वच्छता गृहाचे काम करू नको” असे म्हटल्याचा राग येऊन आरोपी प्रमिला जॉन जाधव सह सहा जणांनी काठीने मारहाण केल्याची फिर्याद विशाल अनिल जाधव रा.सुरेगाव यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.
सुरेगाव येथील फिर्यादी व आरोपी यांचा स्वच्छता गृहांच्या जागेवरून वाद न्यायालयात सुरु आहे.आज दुपारी २.४५ वाजता फिर्यादी हा आरोपी आशिष सॅमसंग जाधव यास म्हणाला की,”तू स्वच्छता गृहाचे काम करू नको,न्यायालयातील खटल्याचा निकाल लागल्यावर बघू “असे बोलल्याचा राग येऊन हि मारहाणीची घटना घडली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव ग्रामपंचायत हद्दीत फिर्यादी विशाल जाधव व आशिष सॅमसंग जाधव हे चुलत भाऊ असून ते शेजारी-शेजारी राहतात.त्यांचा स्वच्छता गृहांच्या जागेवरून वाद न्यायालयात सुरु आहे.आज दुपारी २.४५ वाजता फिर्यादी हा आरोपी आशिष सॅमसंग जाधव यास म्हणाला की,”तू स्वच्छता गृहाचे काम करू नको,न्यायालयातील खटल्याचा निकाल लागल्यावर बघू “असे बोलल्याचा राग येऊन आरोपी विशाल अनिल जाधव,प्रमिला जॉन जाधव,सॅमसंग देवानंद जाधव,सुनीता सॅमसंग जाधव,अक्षय जॉन जाधव,नम्रता सॅमसंग जाधव,आशिष सॅमसंग जाधव,सर्व रा,सुरेगाव यांनी लाठीकाठी हातात घेऊन फिर्यादी विशाल जाधव यास मारहाण करून गैरकायद्याची मंडळी जमवून लाथा बुक्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली असल्याचा गुन्हा कोपरगाव तालुका पोलीस ठण्यात दाखल केला आहे.
या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गु.र.क्रं.५५०/२०२० भा.द.वि.कलम ३२४,३२३,१४३,१४७,१४९,५०४,५०६ प्रमाणे आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार ए. एम.कुसारे हे करीत आहेत.