निधन वार्ता
बाळासाहेब साखरे यांचे निधन
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव व्यापारी महासंघाचे महासचिव प्रदीप साखरे यांचे पिताश्री बाळासाहेब दुर्गाप्पा साखरे (वय-६८) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले आहे.त्यांच्या पच्छात पत्नी,दोन मुले,एक भाऊ,सुना नातवंडे असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
बारा वर्षा पूर्वी स्व.बाळासाहेब साखरे यांनी राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांच्या सहकार्याने समता सहकारी पतसंस्थेत कॅन्सर शिबिराचे यशस्वी आयोजन करून अनेकांना मदत केली होती.दुर्दवाचा भाग असा की ज्या डॉ.राजनगरकर या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हे शिबिर घेतले होते.त्यांच्याकडे त्यांना उपचारासाठी भरती व्हावे लागले होते.
स्व.बाळासाहेब साखरे यांनी अत्यंत प्रतिकूल कालखंडात आपला शिंपी व्यवसाय सुरु करून तो विक्रमी पातळीवर वाढवला होता.यात विक्रमी यश प्राप्त केल्यावर त्यांनी या व्यवसायाला सहजगत्या रामराम करून अन्य व्यवसायात पदार्पण केले होते.त्यांनी ज्या-ज्या व्यवसायात हात घातला त्या-त्या व्यवसायात यश प्राप्त केले होते.त्यांचे चिरंजीव प्रदीप साखरे यांनी आता स्टील व्यवसायात मोठे यश मिळवले आहे.बारा वर्षा पूर्वी त्यांनी राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांच्या सहकार्याने समता सहकारी पतसंस्थेत कॅन्सर शिबिराचे यशस्वी आयोजन करून अनेकांना मदत केली होती.दुर्दवाचा भाग असा की ज्या डॉ.राजनगरकर या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हे शिबिर घेतले होते.त्यांच्याकडे त्यांना उपचारासाठी भरती व्हावे लागले होते.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.ते समता पतसंस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांच्या कार्यात हिरहिरीने सहभागी होत असत.