आरोग्य
कोपरगावच्या ग्रामीण भागात रुग्णवाढ थांबणार कधी ?
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहर व तालुक्यात शहरातील अनेक मान्यवरांना कोरोनाने गाठले असताना आज कोपरगाव तालुक्यात एकूण १३७ अँटीजन रॅपिड टेस्ट करण्यात आल्या असून त्यात १९ रुग्ण बाधित तर नगर येथे तपासणीसाठी अन्य १०० स्राव पाठवले आहे तर येथुन आलेल्या अहवालात एकही स्राव बाधित आला नाही तर बाधित संख्येत खाजगी प्रयोग शाळेत ०२ रुग्ण बाधित आढळले आहे. आज एकूण २१ जण बाधित आले आहे.तर आधी भरती असलेल्या १० रुग्णांस उपचारानंतर सोडून दिले असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी कृष्णा फुलसौन्दर यांनी दिली आहे.शहरात व ग्रामीण भागात आज रुग्ण मोठ्या संख्येने आढळल्याने चिंतेचा विषय निर्माण झाला आहे.
नगर जिल्ह्यात बाधित रुग्णांचा आकडा ६३ हजार ७०९ जाऊन पोहचला आहे.तर आता पर्यंत ९३८ जणांनी आपले प्राण देऊन किंमत चुकवली आहे.कोपरगाव तालुक्यातील गत काही दिवसातील रुग्ण धरून ४० जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे.गत काळात ग्रामीण भागात अधिक प्रमाणावर रुग्ण वाढ होत आहे.त्यामुळे आ.काळे यांनी उपाय योजनांसाठी नुकतीच तातडीची बैठक बोलावली होती त्यामुळे गांभीर्य वाढले आहे.
दरम्यान कोपरगाव शहरात आज ०३ रुग्ण आढळले आहे.त्यात सप्तर्षी मळा एक पुरुष वय-६४, धान्यमार्केट यार्ड महिला वय-३५,गांधीनगर एक पुरुष वय-६३,आदींचा समावेश आहे.