गुन्हे विषयक
कोपरगावात हळदीच्या कार्यक्रमात दगडफेक,नऊ आरोपी अटक
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील टाकळी नाक्या नजीक असलेल्या बौद्ध विहार नजीक रहिवाशी असलेल्या फिर्यादीच्या दिराचा रात्री ९.३० वाजता हळदीचा कार्यक्रम सुरु असतानाच आरोपी दिपक राजेंद्र नाईकवाडे,अमोल नरेंद्र पॆकले,दशरथ मच्छिन्द्र त्रिभुवन,शरद मच्छिन्द्र त्रिभुवन,विशाल पिंगळे,विकी सरोदे,अजय दिलीप डावखर,आकाश रोहकले,सचिन साळवे,साईनाथ मच्छिन्द्र त्रिभुवन,गणेश बाबुराव काटे सर्व रा.कोपरगांव यांनी फिर्यादी यांच्या दिराच्या हळदीचा कार्यक्रम चालू असताना यातील आरोपीनीं मजकूर यांनी गैरकायद्याची मंडळी जमून हळदीच्या जेवणाचे कार्यक्रमात दगडफेक करून स्टील पाइप व विटांनी मारहाण करून जेवणाच्या भांडणाची मोडतोड करून नुकसान करून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची फिर्याद योगिता सुरेश थोरात (वय-३०) यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल केल्याने कोपरगाव शहर परिसरात खळबळ उडाली आहे.
या भांडणाचे मूळ कारण नेमके समजू शकले नाही.त्या बद्दल पोलिसी सूत्रांनी माहिती दिली नाही.दरम्यान यातील नऊ आरोपींना पोलिसानी अटक करून आज न्यायालयासमोर हजर केले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.तर अन्य दोन आरोपी मात्र फरार असल्याचे समजते.या भांडणाची शहरात उलटसुलट चर्चा सुरु आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव शहरातील खडकी नाक्याजवळ फिर्यादी महिला योगिता थोरात या आपल्या कुटुंबियासमवेत राहतात त्यांच्या दिराचे आज लग्न शिर्डीत असल्याने त्यासाठी वऱ्हाडी मंडळी श्रीरामपूर येथून आली होती.त्यांच्या हळदीचा कार्यक्रम काल धामधुमीत रात्री सुरु होता.त्याच वेळी रात्री साडेनऊ वाजता वरील दीपक नाईकवाडे व अन्य वरील नावाचे अन्य दहा आरोपी हे गैरकायद्याची मंडळी घेऊन आले व त्यांनी हळदीच्या समारंभात पाहुण्यांच्या हळदीचा कार्यक्रम सुरु असताना तेथे समूहाने आले व त्यांनी हळदीच्या जेवणाच्या कार्यक्रमात दगडफेक सुरू केली त्यामुळे त्या ठिकाणच्या पाहुण्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
त्या ठिकाणी स्टीलच्या पाईपने व विटांनी मारहाण केली आहे.व जेवणाच्या भांड्याची तोडफोड केली आहे.व जीवे मारण्याची धमकी दिली व दहशत निर्माण केली असल्याची फिर्याद फिर्यादी महिलेने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.मात्र भांडणाचे कारण नेमके समजू शकले नाही.त्या बद्दल पोलिसी सूत्रांनी माहिती दिली नाही.दरम्यान यातील नऊ आरोपींना पोलिसानी अटक करून आज न्यायालयासमोर हजर केले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.तर अन्य दोन आरोपी मात्र फरार असल्याचे समजते.
कोपरगाव शहर पोलिसानी या प्रकरणी वरील आरोपींविरुद्ध आपल्या दप्तरी गु.र.क्रं. ८३०/२०२० भा.द.वि.कायदा कलम ३२४,३३७,४२७,१४३,१४७,१४८,१४९,५०४,५०५,३४ प्रमाणे आरोपीं विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.डी.आर.तिकोणे हे करित आहेत.