धार्मिक
गुरु नानक देव हे परमेश्वराचे अंश-आराधना गरजेची
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
गुरु नानकांनी समाजाला दिलेला सगळ्यात महत्त्वाचा संदेश.‘ईश्वर एक आहे आणि चराचरात त्याचे वास्तव्य आहे.आपला कर्ता,धर्ता आणि पिता सारे काही तोच आहे,त्यामुळे प्रत्येकांशी आपण प्रेमपूर्वक भावनेने वागले पाहिजे’ त्यामुळे त्यांच्या संदेश पाळण्याची आज गरज असून गुरु नानक देव हे परमेश्वराचे अंश असल्याचे प्रतिपादन कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
शीख धर्माचे संस्थापक आणि शिखांचे पहिले गुरू नानक त्यांचा जन्म रवी नदीच्या काठी वसलेल्या तलवंडी नावाच्या गावात कार्तिकी पौर्णिमेवर खतरिकूल येथे झाला.काही विद्वान त्याच्या जन्मतारीख १५ एप्रिल,१४६९ मानतात.पण प्रचलित तारीख कार्तिक पौर्णिमा आहे, ती दिवाळीनंतर पंधरा दिवसांनी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये येते.संत गुरुनानक यांच्या वडिलांचे नाव मेहता काळू जी, आईचे नाव तृप्त देवी.त्याच्या बहिणीचे नाव नानकी होते.
कोपरगाव येथे शीख धर्माचे धर्मगुरु गुरु नानक यांची जयंती आज शीख बांधवांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली त्या निमित्त कोपरगाव येथील गुरुद्वारात लंगर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक पद्माकांत कुदळे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगूले,संतोष चवंडके,नगरसेवक मंदार पहाडे,संदीप पगारे,शिवसेना शहराध्यक्ष कलविंदरसिंग डडियाल,बाबा हरजित सिंग,दिपासिंग ठकराल,चंद्रमोहन पापडेजा,सेवासिंग साहणी,सनीसिंग पोथीवाल,राजसिंग भाडिया,रमेश गवळी,धनंजय कहार,दिनकर खरे,राजेंद्र खैरनार,राजेंद्र वाकचौरे आदी उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,शिख समाजबांधवांसाठी अत्यंत पवित्र असणारा दिवस म्हणजे शीख धर्माचे संस्थापक आणि शिखांचे पहिले धर्मगुरू गुरुनानक यांचा जन्मदिवस.या दिवशी शीखधर्मीय बांधव गुरुनानक जयंती,गुरुपुरब,गुरुपर्व आणि आणि प्रकाशपर्व साजरे करतात.याच दिवशी धर्मगुरू गुरुनानक यांच्या जयंती निमित्त संपूर्ण देशभर गुरुद्वारामध्ये लंगरचे आयोजन केले जाते.त्याप्रमाणे कोपरगाव येथील गुरुद्वारामध्ये देखील लंगरचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी त्यांनी गुरुद्वारामध्ये धर्मगुरू गुरुनानक यांच्या ५५१ व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करून सर्व शीख बांधवाना गुरूपुरब निमित्त शुभेच्छा दिल्या. सर्वानी एकत्र बसून भोजन घेण्याच्या गुरुनानक यांनी १५ व्या शतकामध्ये सुरु केलेल्या लंगर परंपरेमध्ये सहभागी होवून आ.आशुतोष काळे यांनी सर्व सामान्यांबरोबर भोजन घेतले.