जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
धार्मिक

संत नामदेव महाराज जयंती उत्साहात संपन्न

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव- कोपरगाव शहरातील सुभद्रानगर परिसरात श्री विठ्ठल रुख्मिणी व श्री संत नामदेव महाराज यांची ७५० वी जयंती उत्सत्वा निमित्त श्री अभिषेक व महापुजा कार्यक्रम नासिक येथील श्रद्धा व कपिल सतीशराव जगताप यांच्या हस्ते नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला आहे.

संत शिरोमणी नामदेव महाराज हे महाराष्ट्रातील वारकरी संतकवी होते.त्यांचे आडनाव रेळेकर असे होते.ते मराठी भाषांमधील सर्वाधिक जुन्या काळातील कवींपैकी एक होते.त्यांनी व्रज भाषांमध्येही काव्ये रचली.शिखांच्या गुरू ग्रंथसाहिबातहिले चरित्रकार,आत्मचरित्रकार आणि ‘कीर्तना’च्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबपर्यंत नेणारे आद्य प्रचारक होते.कोपरगावातही त्यांचे मंदिर उभे राहिले हि समाधानाची बाब आहे.

या प्रसंगी कोपरगाव तालुक्यातील समस्त शिंपी समाजाच्या वतीने कै.द्वारकाबाई व कै.ह.भ.प.दामोदर गोविंद निकुंभ यांच्या स्मरणार्थ कोपरगावचे मालती व दत्तात्रय दामोधर निकुंभ व नाशिक येथील सौ. श्रद्धा व श्री कपिल सतीश जगताप यांच्याकडून श्री विठ्ठल-रुख्मिणी व श्रीसंत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या चरणी कैवल्यधामचे उद्घाटन समता नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांचे हस्ते करण्यात आले आहे. तसेच त्या ध्यान मंदिराच्या कोनशीला अनावरण करण्यात आले. दत्तात्रय निकुंभ यांनी स्व.खर्चाने या ध्यान मंदिराचे काम पूर्णत्वास आणले आहे.

या प्रसंगी ओमप्रकाश कोयटे म्हणाले की, “कोपरगाव तालुक्यातील शिंपी समाज हा मोठ्या प्रमाणात असून धार्मिक क्षेत्रात मोठे योगदान आहे.सुभद्रानगर परिसरात कैवल्य धामचे समर्पण करून समाज हिताच्या दृष्टीने उचललेले पाऊल आहे.याचा फायदा शिंपी समाजासह इतर जनतेलाही होईल आणि त्यातून संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या विचारांचा प्रचार होऊन मोठ्या प्रमाणात अंगीकार करण्यास मदत होईल’.

या कार्यक्रमाला नाशिक येथील वंदना व सतीशराव प्रभाकर जगताप,प्रभाग क्रमांक दोनचे नगरसेवक जनार्दन कदम,नगरसेविका दिपा गिरमे यांचेसह कार्यकर्ते प्रताप जोशी यांची उपस्थिती होती तर हेमंत चव्हाण,सुनील खैरनार,पृथ्वीराज बिरारी आदीसह कोपरगाव तालुक्यातील शिंपी समाज मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. ध्यान मंदिराच्या बांधकामासाठी सिव्हील इंजिनिअर्स चंद्रशेखर भोंगळे,नितीन सदावर्ते हि वास्तु उभारण्यास अनमोल सहकार्य केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close