कोपरगाव तालुका
कोपरगाव तालुका पोलीस ठाणेही अधिकाऱ्यांविना मोकळे !
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी बदली होऊन आठवडाही उलटत नाही तोच आज कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांची जिल्हा अधीक्षक पाटील यांनी बदली करून त्याना नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पदाची धुरा सोपवली असल्याचे वृत्त हाती आले आहे.त्यामुळे आता कोपरगाव शहरापाठोपाठ तालुक्याला कोणी वाली राहिला नसून आता कोण पोलीस निरीक्षक येणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
पोलीस निरीक्षक अनिल कटके यांचा स्वभाव जरी मितभाषी असला तरी ते वेळप्रसंगी कठोरही होत असत.नुकताच धोत्रे येथील प्रसंग त्याचा पुरावा आहे.काही असामाजिक तत्त्वांनी रातोरात एका महापुरुषांचा पुतळा बेकायदा बसवला होता.त्यांनी तो प्रयत्न तेवढ्याच ताकतीने हाणून पाडला होता.व या असामाजिक तत्वांना जरब बसवून तो काढून घ्यायला भाग पाडला होता.
कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात तत्कालीन पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या जागी अनिल कटके यांची नेमणूक दि.०७ सप्टेंबर २०१९ रोजी झाली होती.तो पासून या पदावर कार्यरत होते.त्यांनी आपल्या काळात ग्रामीण भागात गुन्हेगारीवर वाचक ठेवलाच पण कायदा सुव्यवस्था अबाधित राखली होती.त्यांनी अनेक रस्ता लुटीतील आरोपी जेरबंद केले होते.तर जबरी गुन्ह्यातील आरोपीना गजाआड केले होते.त्यांचा मितभाषी स्वभाव जरी असला तरी ते वेळप्रसंगी कठोरही होत असत.नुकताच धोत्रे येथील प्रसंग त्याचा पुरावा आहे.काही असामाजिक तत्त्वांनी रातोरात एका महापुरुषांचा पुतळा बेकायदा बसवला होता.त्यांनी तो प्रयत्न तेवढ्याच ताकतीने हाणून पाडला होता.व या असामाजिक तत्वांना जरब बसवून तो काढून घ्यायला भाग पाडला होता.त्यांचेकडे नुकताच कोपरगाव शहराचाही अधिभार आला होता.नुकत्याच दत्तनगर येथील आरोपींना त्यांनी गजाआड केले होते.त्यांचा आपल्या कर्मचाऱ्यांवर आदरयुक्त दबाव होता.समुपदेशन करण्यात त्यांचा हातखंडा होता.त्यांनी पोलीस ठाण्यात न्यायासाठी आलेल्या नागरिकाला नाराज केले नाही त्याचे पूर्ण शंकासमाधान केले होते.त्यामुळे त्यांनी एक गाव एक गणपती योजना तालुक्यात यशस्वी राबवली होती.गावोगाव बैठक घेऊन नागरिकांना समजावून सांगणे हि बाब कठीण होती.कारण तालुका पोलीस ठाण्याची हद्दीचा विचार केला तर हे मोठे आव्हान होते.त्यांनी ते विनातक्रार लीलया पेलले होते.त्यांना खरेतर चौदा महिन्याचा कालावधी कमी मिळाला आहे.तरीही त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आता जिल्हास्तरावर आता स्थानिक गुन्हे शाखेचे काम सोपवले आहे.त्यांना आता आव्हान पळवून दाखवावे लागणार आहे.ते ती जबाबदारी लीलया पेलतील यात शंका नाही.या तालुका पोलीस ठाण्यास स्थापने पासून म्हणजे सन-२०१५ पासून मितभाषी अधिकाऱ्यांची परंपरा लाभली असून आता कोण अधिकारी येणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.